शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव छायचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:45 IST

अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशनच्यावतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथील कलादालनात आयोजित वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. त्याला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशनच्यावतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथील कलादालनात आयोजित वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. त्याला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अ‍ॅनिमेशन कॉलेजचे संचालक आणि बॉम्बे आर्ट गॅलरीचे माजी अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात पाहुण्यांचे स्वागत अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मनीष जगताप यांनी केले. सोहळ्याला संघटनेचे सल्लागार जयंत दलाल, रामेश्वर गुल्हाने, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक एम.एस. रेड्डी, किरण पातूरकर, नागपूर येथील सुप्रसिद्ध छायाचित्रकार शेखर सोनी यांनी सदिच्छा भेट दिली. राहुल गुप्ता, मनोज बिंड, अभिमन्यू आराध्य, मीनाक्षी राजपूत, मनीष तसरे, प्रवीण दौंड यांनी परिश्रम घेतले.दूरदूष्टी हाच छायाचित्रणाचा पायाउत्कृष्ट छायाचित्रणासाठी दूरदृष्टीचा पाया मजबूत असावा लागतो. दहा लाख लोकसंख्येच्या शहरात एवढे छायाचित्रकार ही अभिमानाची बाब आहे. लग्नाचे फोटो, एखादा प्रसंग कैद करताना काय टिपणार, हे छायाचित्रकाराच्या मनात असते. मात्र, वन्यजीव छायाचित्रण ही वेगळी अनुभूती आहे. समोर श्वापदांच्या रूपात प्रत्यक्षात मृत्यू डोळ्यांसमोर ठेवून छायाचित्रण करणे ही साधी बाब नाहीच. आपल्या या कलेला योग्य स्थान मिळावे, यासाठी आमच्या स्वागतासाठी वाजविलेला ढोलताशा आयुक्तांच्या घरासमोर वाजविण्याची गरज आहे. आपले कलादालन उत्कृष्ट व्हावे यासाठी आंदोलनाची गरज आहे, असे विजय राऊत याप्रसंगी म्हणाले.लेखकांपेक्षा छायाचित्रकारांना येणार महत्त्वखरे तर वन्यजीव छायाचित्रण हा माझा छंद असला तरी मला इतरांनी काढलेले छायाचित्रे पाहायला फार आवडते. वन्यजीव छायाचित्रांचे महत्त्व आता वाढीस लागले आहे. हजार शब्दांचे काम एक छायाचित्र करीत असते. यामुळे लेखकांपेक्षा छायाचित्रकारांचे दिवस येणाऱ्या काळात उत्तम असणार असून, त्यांचे महत्त्व वाढणार आहे. पुढच्या काळात मेळघाटात जाऊन मी फोटोग्राफीचा वर्कशॉप घेईन. लहानपणी पोहण्याच्या स्पर्धेसाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आलो होतो. त्यानंतर आता पहिल्यांदाच अमरावतीला येतो आहे. यापुढे वन्यजीव छायाचित्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी सदैव सोबत राहील, अशी ग्वाही बैजू पाटील यांनी दिली.