शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांना निवडून आणण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:48 IST

महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणणारच, असा संकल्प युवक काँग्रेसच्या तरुणांनी येथील अभियंता भवनात बुधवारी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणणारच, असा संकल्प युवक काँग्रेसच्या तरुणांनी येथील अभियंता भवनात बुधवारी केला.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट) रिपाइं (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा स्वाभिमानी पक्ष व मित्रपक्ष संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ बुधवारी येथील अभियंता भवनात अमरावती व बडनेरा विधानसभा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी तरुणाईने हा संकल्प सोडला.नवनीत राणा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, त्यांचे हात बळकट करावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी केले.नवनीत यांच्या विजयासाठी सर्व युवक दहा दिवस संपूर्ण ताकदीनिशी प्रचार करणार आहेत. त्यांना निवडून आणल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे वचन युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिले.ही लढाई आता अस्तित्वाची आहे. प्रत्येक घरापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मंदिर, मशिदीलाही आम्ही भेटी देणार असल्याचे यावेळी आमदार राणा यांनी सांगितले. मेळाव्यात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.व्यासपीठावर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष देवयानी कुर्वे, नितीन बोरेकर, मो. आसिफ, अल्पसंख्याक अध्यक्ष एजाज पहेलवान, महासचिव नासिम खान, फिरोज शाह, अभिजित देशमुख, समीर जिलानी, गुड्डू हमीद, संकेत कुलट, बडनेरा विधानसभा अध्यक्ष योगेश बुंदेले, प्रदेश महासचिव समीर जवंजाळ, नीलेश गुहे, मो. जावेद, काका तिवारी, राजा बांगडे, रोहित वैद्य, नारायण यादव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.‘पाना’ चिन्हाची मोहीमनवनीत राणा यांच्या ‘पाना’ या बोधचिन्हाच्या प्रचाराची जोरदार मोहीम आघाडीने उघडली आहे. ‘पाना’ चिन्हाचे बॅनर, पोस्टर सर्वच मंचांवर प्रदर्शित केले जात आहे.

टॅग्स :amravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019