अचलपूर पालिकेत खडाजंगी : वादग्रस्त जागा विकण्यावर स्थगितीपरतवाडा : वादग्रस्त ठरलेले मुख्याधिकारी धनंजय जावळीकर रजेवर जात असल्याने त्यांच्या आराजाची चौकशी यवतमाळ मेडिकल बोर्डामार्फत करण्यासोबत, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंताची वेतनवाढ रोखण्यात यावी, अवैघ नळ कनेक्शन तत्काळ बंद करावे, शौचालयाचा निधी तीन टप्प्यांत, उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रस्ताव बांधकाम विभागाचे गांधीपूल येथील व्यापाऱ्यांना जागा विकण्याचा घाट पुढील बैठकीपर्यंत रद्द करण्यात आला. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर अधिकारी, नगरसेवकांत खडाजंगी झाली.सोमवारी अचलपूर नाग पालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी ३ वाजता होती. सभेत एकूण १६ विषय ठेवण्यात आले होते. शहरात नगरपालिका विकायला काढण्याची चर्चा आठवड्यपासून असून असल्याने परतवाडा शहरातील दुपाणी चौक येथे नगर पालिकेच्या दुकानदारीला मेनरोड वाइंन्डींग करीता जागा देण्याचा व अचलपूर शहरातील गांधीपूल शॉपींग कॉम्प्लेक्स माधील वाढीव जागा गाळेधारकांना देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या सर्वसाधारण सभेत विषयी सुचिवर ठेवण्यात आला होता. दुकानदारांकडून लाखो रुपये वसुली करुन नगर पालिकेची जागा नगराध्यक्ष रंगानल नंदवंशी यांनी स्थगीत करीत चर्चा करणे घडले.आजारांची चौकशीमुख्याधिकारी धनंजय जावळीकर सतत सुटीवर जातात ते चार दिवसांपूर्वी कुठल्या कारणावरुण सुटीवर गेले याची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक रुपेय ठेपे, प्रफुल्ल महाजन यांनी करताच उपस्थित नगरसेवकांना सहमती दर्शविली. सतत कुठल्या आगाराने ग्रस्त आहेत. त्याचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांपा पाठवून त्यांना यवतमाळ मेडिकल बोर्डाकडे पाठवून चौकशीची शिफारस ठरावात करण्यात आली.न्यू कॉलेज, जुळ्या शहराचा वाद, सेनेचे फटाकेएकंदर १६ विषयावर गाजलेल्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच पत्रकार व नगरसेवक सामना सभागृहात बसण्यावर रंगाला. तो नगराध्यक्ष नंदवंशी यांनी तत्काळ शांत केला तर उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा ठराव घेण्यासह, पी.एम.सी. योजनेंतर्गत दिनदयाल उपाध्याय घरकुल योजनेच्या नव्याने निवीदा काढणे, जयस्तंभ चौक ते अग्रसेन चौक अंजनगाव स्टॉप या चौपदरीकरण रस्त्यााला हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव पारित झाल्याने सभागृहात विविध विषयांवर नगरसेवकानी तर सभागृहाबाहेर ठराव मंजूर झाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. (प्रतिनिधी)
रजेवर गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या मेडिकल बोर्डामार्फत चौकशीचा ठराव
By admin | Updated: February 9, 2016 00:11 IST