शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाला बाधा असल्यास ठराव शासनाला पाठविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:13 IST

अमरावती : महापालिकेची पाच व्यापारी संकुले व मुख्य इमारतीमधील एका बँकेच्या भाडेपट्टीची लीज तीन वर्षांपूर्वी संपुष्टात आलेली आहे. जिल्हा ...

अमरावती : महापालिकेची पाच व्यापारी संकुले व मुख्य इमारतीमधील एका बँकेच्या भाडेपट्टीची लीज तीन वर्षांपूर्वी संपुष्टात आलेली आहे. जिल्हा समितीने रेडीरेकनरनुसार या मालमत्तांची भाडेवाढ केलेली आहे व या मालमत्तांच्या मुदतवाढीच्या विषयाला सभापतींनी या आमसभेत स्थगिती दिलेली आहे. यासंदर्भातील ठराव अद्याप प्रशासनाला अप्राप्त आहे. हा ठराव जर महापालिकेच्या उत्पन्नाला बाधा आणत असेल तर शासनाकडे पाठविण्यात येण्याची तयारी प्रशासनाने केल्याची माहिती आहे.

सभागृहातील विषयावर सभागृहाबाहेर बोलण्यास आयुक्तांची चुप्पी आहे. एकूण या प्रकरणात त्यांनी ‘वेट ॲण्ड वॉच’ ही भूमिका घेतल्याचे दिसून येते. विरोधकांनी रान उठविलेल्या महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या विषयावर सत्तापक्षातील अनेक सदस्यांनीदेखील सहमती असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शासनाने १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या निर्देशान्वये महापालिकेच्या मालमत्तांचे भाडेपट्टा नूतनीकरण अथवा हस्तांतरणासाठी नियम तयार केलेले आहेत व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त महापालिका व सह जिल्हा निबंधक यांची त्रिसदस्यीय समिती गठीत केलेली आहे. या समितीची बैठक ९ जुलै २०२१ रोजी झाली व यामध्ये रेडीरेकनरनुसार भाडे निश्चित करण्यात आलेले आहे व हे भाडे लीज संपल्याच्या दिवसापासून लागू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या आमसभेत या विषयावर चांगलाच गदारोळ झाला. उत्पन्नवाढीच्या विषयाला आमसभेत स्थगिती देण्यात येऊन यावर शासनाने मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय झाल्याने सत्तापक्षात अनेक आरोप होत आहेत.

बॉक्स

डिझेलअभावी वाहन उभे

अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता उर्वरित वाहने डिझेलअभावी उभी आहेत, पंपावर या वाहनांना डिझेल नाकारण्याची नामुश्की महापालिका प्रशासनावर ओढावलेली आहे. अशा परिस्थितीत लीज संपलेल्या संकुलांची भाडेवाढ तीन वर्षांपासून रखडलेली आहे व किमान १२ कोटींचे भाडे वसुलीदेखील झाली नसल्याची बाब उघड झालेली आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या मुद्द्यावर सत्तापक्षाला घेरण्यात येत असल्याचे दिसून येते.