शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हावासीयांनी रिचवले साडेतीन कोटींचे मद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:37 IST

सोमवारी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष जिल्हाभर साजरा करण्यात आला. यामध्ये मद्यशौकीनही मागे नव्हते. मद्यशौकिनांनी ‘थर्टी फर्स्ट’ची संधी साधून या एका दिवसाला सरासरी साडेतीन कोटींचे मद्य रिचवले असल्याची माहिती व्यावसायिकांकडून मिळाली आहे. नियमित व्यवसायपेक्षा सोमवारी ६० टक्के अधिक व्यवसाय झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देवाईन शॉपींना पसंती : ‘थर्टी फर्स्ट’ला मद्यशौकिनांचा ठिकठिकाणी ठिय्या

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोमवारी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष जिल्हाभर साजरा करण्यात आला. यामध्ये मद्यशौकीनही मागे नव्हते. मद्यशौकिनांनी ‘थर्टी फर्स्ट’ची संधी साधून या एका दिवसाला सरासरी साडेतीन कोटींचे मद्य रिचवले असल्याची माहिती व्यावसायिकांकडून मिळाली आहे. नियमित व्यवसायपेक्षा सोमवारी ६० टक्के अधिक व्यवसाय झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.जिल्ह्यात ३३ वाइन शॉपी, २०७ वाइन बार, २२ बीअर शॉपी अधिकृतरीत्या असल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. गेल्या आठवड्याभरापासून बोचऱ्या थंडीने जोर पकडला आहे. रात्रीच्या तापमानातही प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे मद्यपींनी वाइनला पसंती दर्शविली होती. एका वाइन शॉपीतून ‘थर्टी फर्स्ट’ला सरासरी चार लाखांची दारूविक्री झाली. त्यानुसार वाइन शॉपीचालकांचा १ कोटी ३२ लाखांचा व्यवसाय झाला. प्रत्येक वाइन बारमध्ये सरासरी एक लाखांची रुपयांची दारू विक्री झाली. जिल्ह्यात २०७ वाइन बार आहेत. म्हणजे २ कोटी ७० हजारांचा व्यवसाय झाल्याची माहिती आहे. बीअर शॉपीमध्ये सरासरी २५ हजारांची विक्री झाली. म्हणजे २२ बीअर शॉपीमध्ये ५ लाख ५० हजारांची बीअर सरासरी विकल्या गेली. देशीदारू वगळ्ता इतर दारुची जिल्ह्यात ३ कोटी ३८ लाख २० हजारांची दारू अमरावतीकर मद्यशौकिनांनी ‘थर्टी फर्स्ट’ची संधी साधून रिचवली.२५ ठिकाणी कारवाई, २० आरोपींना घेतले ताब्यातराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० व ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्याभरात २५ ठिकाणी केलेल्या कारवाईत २५ जणांना ताब्यात घेतले.३० डिसेंबर रोजीच्या कारवाईदरम्यान आरोपींकडून ३४५ लिटर हातभट्टीची दारू, ४४ लिटर देशी दारू तसेच १३०० लिटर मोहाचा सडवा जप्त केला. ‘थर्टी फर्स्ट’ला सात ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये सात जणांना ताब्यात घेतले आहे.फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागतसोमवारी रात्री १२ वाजता नववर्ष २०१९ चे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आले. शहरातही ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागताला एकच जल्लोष करण्यात आला.कारवाईसाठी आठ भरारी पथकेअवैध दारूविक्री रोखण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आठ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. उत्पादन शुल्क निरीक्षक व दुय्यम निरीक्षक दर्जाचे अधिकारी, शिपाई यांचा या पथकामध्ये समावेश करण्यात आला होता.