शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआर सोसायटीला कुलूप लागल्याने संताप

By admin | Updated: June 3, 2014 23:43 IST

खोलापुरी गेट पोलीस ठाण्यातंर्गत सक्कसाथ परिसरात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (बीएचआर) स्थानिक शाखेला मंगळवारी सकाळी कुलूप लागलेले

पोलीस दाखल : बँकेसमोर खातेदारांचा रोषअमरावती : खोलापुरी गेट पोलीस  ठाण्यातंर्गत सक्कसाथ परिसरात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (बीएचआर) स्थानिक शाखेला मंगळवारी सकाळी कुलूप लागलेले दिसल्याने खातेदारांनी बँकेसमोर संताप व्यक्त केला. अनेक खातेदार  बँकेसमोर एकत्र आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ही माहिती मिळताच खोलापुरी गेटचे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. खातेदारांना कोट्यावधीचा  गंडा घातल्याचा आरोप येथे खातेदारांनी केला.  मुंबई, पुणे व अन्य शहरात या सोयायटीच्या १२२ शाखा आहेत. या सोसायटीची नोंदणी  ३१ ऑगस्ट २00७ रोजी करण्यात आली असून मागील तीन वषर्ा्ंपूर्वी  अमरावतीमध्येही तीन शाखा उघडण्यात आल्या  आहेत. राजापेठ, सक्करसाथ या ठिकाणी दोन शाखा असून नुकतीच एक शाखा कॅम्प येथे उघडण्यात आल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. या सोयायटीकडे अमरावती शहरातील शेकडो खातेधारकांनी आपल्या पैश्याची गुतंवणुक केली आहे. मात्र आज मंगळवारी काही खातेदार बँकेत पैसे काढण्यास गेले असता त्यांना बँक बंद दिसली व लाखो रुपयांनी गंडा घालून ही बँक बंद केल्याची वार्ता खातेदारांपर्यंत पोहोचली. यामुळे या बँकेचे खातेदार बँकेसमोर एकत्र आले आणि काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. खातेदारांनी तक्रार करण्यास पुढे यावे, असे पोलिसांनी खातेदारांना सांगितले. परंतु पोलिसात तक्रार करण्यात कुणीही पुढाकार घेतला नाही. याबाबत खातेदारांनी चौकशी केली असता बँक बंद झाल्याची माहिती मिळाल्याचे ग्राहकांनी एकमेकांना सांगितले.