शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसितांना जमीन निवडीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:01 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात पुनर्वसित भागातून मूळ गावी परतलेल्या आदिवासींशी शुक्रवारी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संवाद साधला.

ठळक मुद्देआदिवासींशी संवाद : खासदार, पालकमंत्री, आमदारांचा संयुक्त दौरा

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात पुनर्वसित भागातून मूळ गावी परतलेल्या आदिवासींशी शुक्रवारी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संवाद साधला. आदिवासींना जमीन निवडण्याची संधी शासनाने दिली असल्याचे यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितले.चिखलदरा तालुक्यातील केलपाणी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजतानंतर आदिवासी व प्रशासनात संवाद साधण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, अचलपूरचे आमदार बच्चू कडू, अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.मी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधीअमरावती येथे शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर सायंकाळी पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी मेळघाटाकडे कूच केली. पालकमंत्री पोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिनिधी असल्याचा दाखला दिला.ते म्हणाले, आदिवासींच्या जमिनीची मागणी पूर्ण करण्यासाठी शासननिर्णय काढण्यात आला आहे. अमरावती व अकोला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वाटपासाठीची जमीन निश्चित करण्यात आली आहे. या जमिनीपैकी योग्य वाटेल ती जमीन निवडण्याची संधीही पुनर्वसितांना मिळेल. पुनर्वसन पॅकेज दिल्यानंतर पुन्हा जमीन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचेही ते म्हणाले. यावेळी खासदार अडसूळ यांच्यासह सर्वच उपस्थितांनी आदिवासींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रात्री ३ वाजतापर्यंत सर्व मंडळी केलापाणी येथे ठाण मांडून होती.नोकरी मिळणार, सहकार्य कराबच्चू कडू यांनी ‘व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसितांना जमीन मिळवून देण्यासाठीचा शासननिर्णय महत्त्वाचा आहे. पेसा अंतर्गत भरती करण्यासाठी आदिवासी बांधवांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. त्यातून नोकरी मिळवून देण्याचीही प्रशासनाची तयारी आहे’, असे मत व्यक्त केले. पुनर्वसित बांधवांनी या निर्णयाचा आदर राखून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी केले.