शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धांच्या 'विसाव्या'ची परवड

By admin | Updated: September 21, 2016 00:16 IST

आयुष्यभर मुलाबाळांसाठी राबराब राबूनही म्हातारपणी सहारा मिळेल, याच अपेक्षेवर असताना आपल्यांनी घरातून चालते केले.

उपेक्षा : प्रशासनाच्या दुर्लक्षाने वृद्धाश्रम बेदखलनरेंद्र जावरे परतवाडाआयुष्यभर मुलाबाळांसाठी राबराब राबूनही म्हातारपणी सहारा मिळेल, याच अपेक्षेवर असताना आपल्यांनी घरातून चालते केले. सहारा मिळाला तो वृद्धाश्रमाचा. मात्र त्याही विसावा देणाऱ्या वृद्धाश्रमाला शासनाने मागील पाच वर्षांपासून पूर्णत: दुर्लक्षित केल्यामुळे जवळपास १४ वृद्धांची परवड सुरू असल्याचे चित्र आहे. परतवाडा-चांदूरबाजार मार्गावरील शेकापूर जवर्डी येथे सापन बहुुद्देशीय संस्था सावळी दातुरातर्फे २०१० पासून विसावा वृद्धाश्रम चालविण्यात येते. या वृद्धाश्रमात जिल्हाभरातील १४ वृद्ध पाच वर्षांपासून राहत आहेत. त्यांची पूर्णत: देखभाल, निवास व्यवस्था शासकीय नियमानुसार केली जात असतानासुद्धा शासनातर्फे अनुदानाच्या नावावर ठेंगा दाखविला आहे. विनाअनुदानित शाळा, वसतिगृह आदींसह इतर बाबीवर कोट्यवधींचा खर्च करणारे शासन वृद्धाश्रमावर मेहरबान नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मुलाबाळांनी साथ सोडल्यामुळे उर्वरित आयुष्त निवांत जगता यावे यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून मिळेल त्या वाटेने निघालेल्या या वृद्धांना जवर्डी येथील विसावा वृद्धाश्रमाने आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा विसावा दिला. मात्र संस्था चालविण्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक खर्च भागविण्यासाठी संस्थाचालकांना सुद्धा इतरांपुढे मदतीचा हात मागत या वृद्धांच्या निवास, भोजन व्यवस्था करावी लागत आहे.अन् मन हळहळले...भाष्कर कौतिक्कर हे अचलपूर न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात. येथे दररोज कौटुंबिक समस्या उद्भवल्यामुळे झालेला वादाचा निपटारा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिजन येतात. यामध्ये सासू-सून व इतर कौटुंबिक वादाचा समावेश असतो. अशावेळी वयोवृद्ध येतात. त्यांच्या हालअपेष्टा व परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना त्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड, घरी परत जाण्यासाठी तिकिटाचे पैसेसुद्धा नसल्याचे चित्र नित्याचेच आहे. सासू-सुनेच्या वादात वृद्धांना घराबाहेर काढून देण्याचे प्रकार मन हेलावून टाकल्यामुळे भाष्कर कौतिक्कर यांनी वृद्धाश्रम उघडण्याचा प्रण केला आणि चांदूरबाजार मार्गावरील त्रिवेणी संगमनजीक सापन बहुउद्देशीय संस्थेंतर्गत विसावा वृद्धाश्रमाची स्थापना केली. शासनाची उदासीनतासमाजकार्य करताना अनेक अडचणींचा सामना संस्था चालकांना करावा लागतो. मात्र ध्येयवेड्यांना आपले कार्य अविरत सुरु ठेवण्यासाठी कशाचीच तमा ते बाळगत नाहीत. शासन इतर संस्थांना अनुदान देत असताना घरातून आप्तस्वकीयांनीच बेदखल केलेल्या निराधार वृद्धांना आसरा देणाऱ्या संस्थांसाठी अनुदान देण्यास का विलंब करते, असा सवाल विसावातील वृद्धांनी केला आहे. शासनाने आम्ही जिवंत असताना मदत देऊन आमच्यावर उपकार करावे, अशी विनवणीदेखील त्यांनी केली आहे. मागील पाच वर्षांपासून सुरू आसलेल्या वृद्धाश्रमाला शासनाने मदत करावी. ज्यामुळे वृद्धांसाठी अधिकाधिक सुविधा पुरविण्यात आर्थिक अड़चण येणार नाही. शासनाने कायदेशीररीत्या संस्थेला मदत करावी- भास्कर कौतिक्कर,संचालक, वृद्धाश्रम.