शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊंच्या लेकींचे शासनाला निवेदन

By admin | Updated: September 23, 2016 00:09 IST

लक्ष-लक्ष मराठ्यांच्या क्रांती मूकमोर्चात युवती व महिलांचा विक्रमी सहभाग लक्षवेधक होता.

मराठा एकजुटीची क्रांती : लक्ष मराठे-दक्ष मराठे, युवतींचा विक्रमी सहभाग अमरावती : लक्ष-लक्ष मराठ्यांच्या क्रांती मूकमोर्चात युवती व महिलांचा विक्रमी सहभाग लक्षवेधक होता. नेहरु मैदानातून निघालेला मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात विसावला. यावेळी शासनाला सादर करावयाच्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. काही युवतींनी स्वयंस्फुर्तीने भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अमुल्या कृष्णकुमार सोळंके, जानकी नितीन यावलीकर, अनुष्का संजय रडके व पुनम रामकृष्ण चिखलकर या जिजाऊंच्या चार लेकींनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना आठ मागण्यांचे निवेदन सादर केले. कोपर्डी येथे घडलेल्या नृशंस घटनेतील सर्व नराधम गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा.अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी कायद्यामध्ये त्वरित सुधारणा करा, कायद्याचा गैरवापर करुन मानसिक छळ करणाऱ्यांना कठोर दंड करण्यासाठी कायद्यात सुधारणा आवश्यक शेतमालास योग्य तो सन्मानपूर्वक भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्या व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू करा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरसकट शासकीय मदत करावी व या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या.मराठा समाजाला शिक्षण व रोजगार क्षेत्रात त्वरित आरक्षण द्या.मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरावर किमान दोन हजार विद्यार्थी क्षमतेचे स्वतंत्र वसतिगृह शासनाच्या स्वतंत्र विभागाकडून उभारण्यात यावे व चालविण्यात यावे.शासनाच्या रोजगार वा उच्च शिक्षण विभागामार्फत मराठा युवकांकरिता स्वतंत्र स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात व चालविण्यात यावे.मराठा समाजाच्या महानायकाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी व अशी बदनामी करणाऱ्या व्यक्ती व संघटनांचे उदात्तीकरण शासनाने थांबवावे.अशी मागणी मोर्चावेळी करण्यात आली. या निवेदनावर तेजस्विनी चौधरी, शिवाणी चव्हाण, सावी बंड, अवंती चौधरी, साक्षी मुंढे, भक्ती तेटू, स्वामिनी वऱ्हाडे, आकांक्षा सोनवणे या युवतीच्या स्वाक्षऱ्या आहेत. ‘ड्रोन’मधून पुष्पवृष्टीनेहरु मैदानातून निघालेला मराठा समाजाचा मूकमोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात स्थिरावला. चहुबाजुने गर्दीच गर्दी अन् भगवामय वातावरण निर्माण झाले होते. या मोर्चावर ड्रोन कॅमेरातून मोर्चावर पुष्पवृष्टी करण्यात आली. हा प्रसंग टिपण्यासाठी अनेकांचे कॅमेरे, मोबाईल आकाशाच्या दिशेने सरसावले. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सादर करण्यात आलेले निवेदन मोर्चाच्या समारोपाच्यावेळी वाचून दाखविण्यात आले. विराट गर्दीमुळे गर्ल्स हायस्कूल चौक तुंबला होता. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंचे पूजन करून काश्मिरातील उरी येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली. मात्र, मोर्चावर ‘ड्रोन’मधून झालेली पुष्पवृष्टी ही आकर्षणाचे केंद्र ठरली होती.मोर्चासोबतच स्वच्छता, शहराच्या इतिहासात प्रथममोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाऊचचे स्टॉल लावण्यात आले होते. हे रिकामे पाऊच स्वयंसेवकांनी त्वरित गोळा केले. तिवसा तालुक्याच्यावतीने अनेक ट्रॅक्टर ट्रॉली या कामी होत्या. तासभऱ्यात पाण्याच्या बॉटल व रिकामे पाऊच उचलून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. मोर्चानंतर स्वच्छता ही अमरावतीकरांनी प्रथमच अनुभवली .अगदी तासभऱ्यात शहर स्वच्छ करण्यात आले. सर्वसामान्य मराठे,स्वयंसेवक आणि महापालिका यंत्रणेने दोन तासात शहर स्वच्छ क ेले.