शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निधी मागणीचे प्रस्ताव पाठविले, ४९० जोडप्यांचे प्रोत्साहन अनुदान अडले

By जितेंद्र दखने | Updated: January 23, 2024 18:53 IST

लग्नानंतर संसारोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासह नव्याने संसार थाटण्यासाठी हे अनुदान आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या कामी येते.

अमरावती : जातीभेद निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे जोडप्यांना ऑक्टोबर २०२१ पासून ५० हजारांच्या अनुदानापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे नोंदणी विवाह केलेले ४९० जोडप्या शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहे.

लग्नानंतर संसारोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासह नव्याने संसार थाटण्यासाठी हे अनुदान आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या कामी येते. मात्र, दोन ते अडीच वर्षापासून अनुदानच मिळाले नसल्याने, या योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. बहुतेक वेळा आंतरजातीय विवाह करणारे जोडपे कुटुंबापासून वेगळे राहतात. नव्याने संसार थाटण्यासाठी त्यांना अनुदानाचा आधार असतो. काही आर्थिक परिस्थिती बेताची आहे. नोंदणी विवाहानंतर अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या काहींना मुले झाली तरी अद्याप अनुदान मिळाले नाही. शासनाकडे वारंवार पाठपुरावा अनुदान मिळाले नाही. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे १९५८ पासून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान दिले जाते. यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जनजाती बौद्ध विशेष मागास वर्गातील पुरुष किंवा महिलांनी सवर्ण हिंदू लिंगायत जैन सिंह धर्मातील पुरुष किंवा महिलेशिवाय केल्यास ५० हजाराचे प्रोत्साहन अनुदान दिले जाते.

आंतरजातीय विवाहाच्या संख्येत वाढसमाजकल्याण विभागाकडे ऑक्टोबर २०२१ पासून ४९० जोडप्यांनी नोंदणी विवाहानंतर अर्ज केले. तत्पूर्वी वर्षाला ७० ते ८० जोडपे प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज करायचे. परंतु, आंतरजातीय विवाहाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ पर्यत १२५ नवीन जोडप्यांनी अर्ज केले.

पाठपुरावा सुरू असला तरी अद्याप अनुदान नाहीआंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. परंतु, सतत पाठपुरावा सुरू आहे. ऑक्टोबर २०२१ पासून अनुदान आले नाही. अनुदान उपलब्ध होताच पात्र लाभार्थ्याना निकषानुसार लाभ दिला जाईल-राजेंद्र जाधवर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी.जि.प. अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती