खबरदारी : पोलीस प्रशासनाचा शहरात तगडा बंदोबस्तअमरावती : लष्कर-ए-तोएबा मुजाहिद्दीन या पाकिस्तानी दहशतवादी व इतर आतकंवादी संघटनानी प्रजासत्ताक दिनी आंतकी हल्ला करण्याचा मनसुबा आखल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली आहे. त्याअनुषंगाने शहरात अलर्ट घोषित झाला असून जिल्हा क्रीडा संकुलासह शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. आतकवांदी घातपाताच्या उद्देशाने लपून बसण्यासाठी शक्यता असल्यामुळे पोलिसांनी वर्दळीच्या ठिकाणी वॉचर्स नेमले असून ते संशयीतावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ट्रीने महत्वाच्या शासकीय इमारती, कार्यालय, विद्युत पावर हाऊस, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, दुरदर्शन केंद्र, आकाशवाणी, धार्मीक स्थळे, संवेदनशिल स्थळावर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला आहे. वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्थाप्रजासत्ताक दिनी वाहतूक शाखेचे पोलीस सज्ज राहून वाहतूक नियंत्रण करणार आहे. नेहरू स्टेडियम व विभागीय आयुक्त कार्यालयातील कार्यक्रम व प्रभात फेरीदरम्यान वाहतूकीस अडथडा होणार नाही. याकडे पोलीस लक्ष ठेवणार आहे. तसेच चारचाकी वाहनाची सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इर्विन चौक ते राजकमल चौक या भागात वाहतूक बंद राहणार आहे. क्रीडा संकुल बंदोबस्तपोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, चेतना तिडके, सहायक पोलीस आयुक्त विनोद वानखडे, मिलिंद पाटील यांच्या नेत्तृत्वात पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, राधेशाम शर्मा, दिगबर नागे, एस.बी. जाधव, रणबीर बयेस, प्रकाश काळे, दिलीप इंगळे, बैद्यनाथ लटपट व प्रकाश आकोटकर यांच्यासह पोलीस कर्मचारी असे १५० पोलिसांचा बंदोबस्त जिल्हा क्रीडा संकूलात राहणार आहे. आत्मदहनविरोधी पथकआंदोलनकर्ते शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आत्मदहनाचा इशारा देतात. अशा आंदोलनकर्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आत्मदहन विरोधी पथक सज्ज राहणार आहे. त्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा स्टेडियम परिसरात आत्मदहन विरोधी पथक सज्ज करण्यात येणार आहे. बिडीडीएस घातपात विरोधी तपासणीबॉम्ब शोधक पथक जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, जिल्हा सत्र न्यायालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नेहरू स्टेडियम, अतिथींचे व्यासपीठ, फ्लॅगपोस्ट, संचनालय मैदान, नवीन खोदकाम, फुलझांड्याच्या कुंड्या व विश्राम गृह आदी ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करणार आहे. डोअर फे्रम मेटल डिटेक्टरनेहरु स्टेडियम येथील कार्यक्रमातील प्रवेशद्वाराच्या ठिकाणी डोअर फे्रम मेटल डिटेक्टर लावण्यात येणार आहे. कार्यक्रमाकरिता येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी मेटल डिटेक्टरमधून केली जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनी शहरात अलर्ट
By admin | Updated: January 26, 2016 00:18 IST