शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी , अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे

By admin | Updated: January 14, 2016 00:14 IST

भारतीय राज्यघटनेने लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ....

आढावा बैठक : विशेषाधिकार समिती प्रमुख नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनअमरावती : भारतीय राज्यघटनेने लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक देवून समन्वयाने कार्य करावे, असे प्रतिपादन समिती प्रमुख आ. नीलम गोऱ्हे यांनी केले. विधान परिषद विशेषाधिकार समितीची अमरावती विभागस्तरीय बैठक व कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त कार्यालयात त्या बोलत होत्या.बैठकीला अप्पर मुख्य सचिव पी.एस. मिना, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, उपसचिव नंदलाल काले, अवर सचिव उमेश शिंदे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते तसेच विभागातील जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जी.श्रीकांत, विजय झाडे , राहुल द्विवेदी तसेच सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिकेचे आयुक्त, मुख्याधिकारी, आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, शासन सर्वसामान्य जनतेसाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती ग्रामपातळीपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी जनतेची गाऱ्हाणी ऐकून विकास कार्य करत असतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकटीत काम करावे लागते. बऱ्याच प्रकरणात हक्कभंगाची प्रकरणे निर्माण होतात, यासाठी नेमका हक्कभंग कशासाठी होतो, विशेषाधिकार कशासाठी आहे, याची माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यावेळी समिती प्रमुखांनी विभागातील अधिकाऱ्यांना विशेषाधिकाराबाबत दिशानिर्देश दिले.(प्रतिनिधी)घटनात्मक तरतुदीची दिली माहितीविशेषाधिकारासंदर्भात असणाऱ्या घटनात्मक तरतूदीचे पॉवर पॉईंटद्वारे सादरीकरण उपसचिव नंदलाल काळे यांनी केले. यामध्ये विधिमंडळाची कार्यवाही व न्यायालये, सभागृहात भाषण स्वातंत्र्याचा विशेषाधिकार, भाषण स्वातंत्र्य व सभागृहाची कार्यवाहीबाबतचे विशेषाधिकार, इतर विशेषाधिकार, सदस्यांना अटकेपासून संरक्षण, विधिमंडळ सभागृहाच्या आवारात समन्स बजावणे, न्यायालयासमोर विधिमंडळ सभागृहाचे कागदपत्रे सादर करणे, विधानमंडळासमोर साक्षीसाठी उपस्थित राहणे, विशेषाधिकाराचा भंग याबाबत माहिती यावेळी देण्यात आली.मार्गदर्शक तत्त्वांचे तपशीलवार सादरीकरणसामान्य प्रशासन विभागाच्या २७ रोजीच्या परिपत्रकात विधानमंडळ, संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देणे, त्यांच्याकडून आलेले पत्र, अर्ज, निवेदनांना पोच देणे, त्यावर सत्वर कार्यवाही करणे, शासकीय कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणे, त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापणे इत्यादीबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे तपशिलवार सादरीकरण यावेळी करण्यात आले.