शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल लवकर मिळून उपचारांना गती येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:01 IST

विभागाचे मुख्यालय असूनही अमरावती जिल्ह्यात डेंग्यू चाचणीची प्रयोगशाळा नाही. अकोल्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास अनेक दिवस लागतात. अशा काळात निदान न होणे, प्लेटलेट्स कमी होणे व जोखीम वाढणे असे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी तातडीने या मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला असून, लवकरच अशी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याचे नियोजन आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीत डेंग्यू चाचणी प्रयोगशाळा सुरू होण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून, त्यामुळे लवकर अहवाल मिळून रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देणे शक्य होणार आहे, असे पालकमंत्री  यशोमती ठाकूर यांनी सांगितले._  डेंग्यू या आजाराचे निदान तत्काळ होऊन उपचार मिळणे आवश्यक असते.  वेळेत निदान  न झाल्यास अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. विभागाचे मुख्यालय असूनही अमरावती जिल्ह्यात डेंग्यू चाचणीची प्रयोगशाळा नाही. अकोल्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास अनेक दिवस लागतात. अशा काळात निदान न होणे, प्लेटलेट्स कमी होणे व जोखीम वाढणे असे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी तातडीने या मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला असून, लवकरच अशी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. डेंग्यू चाचणीसाठी अमरावती स्तरावर स्वतंत्र प्रयोगशाळेची गरज लक्षात घेऊन याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा सहसंचालक यांच्या माध्यमातून आयसीएमआरला पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुणे येथील आरोग्य सहसंचालक कार्यालयातर्फे डेंग्यू तपासणी प्रयोगशाळेकरिता रिडर, वॉशर, कॉम्प्युटर आणि इतर आवश्यक साधने उपलब्ध होणार आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या प्रयोगशाळेच्या निर्मितीचे नियोजन आहे. ही लॅब लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. कोरोना काळातही स्थानिक स्तरावर चाचणी अहवाल मिळावे, यासाठी गतीने प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली होती. डेंग्यू चाचणीसाठी लॅब सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चाचणी अहवाल वेळेत प्राप्त होऊन रुग्णांना उपचार मिळणे शक्य होईल.

सुपर स्पेशालिटीच्या नवीन इमारतीत स्वतंत्र कक्षडेंग्यू चाचणीच्या प्रयोगशाळेसाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन्ही इमारतींच्या मध्यभागी बांधलेल्या दोन विशेष खोल्यांची लॅब बांधणीसाठी तपासणी केली. या प्रयोगशाळेचा व साधनसामग्रीचा प्रस्ताव आरोग्य सेवा विभाग, पुणे यांच्या सहसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे, असे हिवताप नियंत्रण कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

 

टॅग्स :dengueडेंग्यूYashomati Thakurयशोमती ठाकूर