शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांनी मागविला अहवाल

By admin | Updated: September 22, 2016 00:23 IST

परिसरात साथीचे आजार सुरु असतंना स्थानिक प्राथमिक स्वास्थ केंद्रामध्ये खुद्द वैद्यकिय अधिकारीच अनुपस्थित असल्याने...

कारवाईची टांगती तलवार : पुसला येथील आरोग्य केंद्रातील अनागोंदीचे प्रकरण वरूड/पुसला : परिसरात साथीचे आजार सुरु असतंना स्थानिक प्राथमिक स्वास्थ केंद्रामध्ये खुद्द वैद्यकिय अधिकारीच अनुपस्थित असल्याने शेकडोे रुग्णांना ताटकळत बसावे लागत असते तर विनाअर्ज रजेवर राहून जुन्या अर्जात खोडतोड करुन तोच अर्ज पुन्हा कमचाऱ्यांकडून सादर करणे असे एक ना अनेक प्रकार होवून याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांचेसह शेकडो संतप्त नागरीकांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांची खुर्चीर् जप्त करुन दवाखान्याला कुलूप ठोकले होते. यामुळे ढेपाळलेल्या आरोग्य यंत्रणेच्या कारभाराची लक्तरे मात्र उघडयावर पडली. मात्र, वैद्यकिय अधिकारी राहुल भुतडा यांचेवरील कारवाईचे काय ? असा सवाल सुध्दा पुसलावासियांनी केला होता. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच त्याची तातडीने दखल घेऊन आरोग्य विभागाकडून विभागीय आयुक्तांनी वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल मागितल्याचे वृत्त आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी तालुक्यापासून ३० ते ३५ किमी अंतरावर अनेक आदीवासी खेडी आहेत. वाहतुकीची साधने नसल्याने बहुदा आदिवासी बांधव पायदळ रुग्णालयात उपचाराकरीता येतात. पुसला हे गांव अमरावती पांढुर्णा राज्यमहामार्गावर आहे तर डोंगरदऱ्यांमध्ये १० ते १५ गावे येतात. या नागरिकांच्या उपचाराकरीता पुसला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. अनेकवेळा आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपस्थित नसल्याने येथील कर्मर्चारीच रुग्ण तपासणी करुन औषधोपचार करीत असल्याने अनेकांवर चुकीचे उपचार झाल्याचे सांगण्यात येते. पुसला परिसरात तापासह साथीच्या आजाराने नागरीक त्रस्त असतांना येथील प्राथमिक स्वास्थ केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार सुरुच आहे. केवळ सकाळच्या बाह्यरूग्ण विभागातील रुग्णांची तपासणी केल्यांनतर डॉक्टरांना रान मोकळे असते. अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले गेले. ताुलका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घातली. १०७ रुग्णांची तपासणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करून दिलासा दिला होता. या आंदोलनाची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव यांनी घेऊन तातडीने एका डॉक्टरची नियुक्ती केली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. भुतडा यांचेवर कारवाईचे काय असा प्रतिसवाल पुसलावासी विचारत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्याची प्रतीक्षा वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी येथे सुसज्ज निवासस्थान आहे. परंतु येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी राहुल भुतडा वरूडहून ये-जा करतात. यामुळे सरकारी निवास स्थान वैद्यकिय अधिकाऱ्याच्या प्रतिक्षेत आहे. तीन महिन्यांकरिता साथरोगांच्या नियंत्रणाकरिता जिल्हा प्रशिक्षण केंद्रातून दोन आरोग्यसेवक पाठविण्यात आले होते. दोन आरोग्यसेवकांना अधिकाऱ्यांचे शासकिय निवासस्थान वास्तव्याकरीता दिले होते. मात्र विज बिलांच्या मुद्यावरून त्यांना परत पाठविण्यात आले. तशी शेरा पुस्तिकेमध्ये सुद्धा जिल्हा आरोग्यसेवक प्रशिक्षक आसोले यांनी नोेंद घेतली असल्याचे सांगण्यात येते.पुसला येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी भुतडा कर्तव्यात कसूर करून वाटेल तेव्हा येत जात असल्याने अशा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. विभागीय आयुक्तांनी या अधिकाऱ्याच्या कामकाजाच्या तक्रारीचा अहवाल मागितला आहे.- विजय श्रीराव, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप