शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यातील ‘त्या’ दोन्ही मुलींचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

तालुक्यातील दोन मुलींना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांना अमरावती येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे मेळघाटात एकच खळबळ उडाली होती. त्यात पुणे येथून आलेल्या मेळघाट येथील मुलीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सोमवारी आल्यानंतर गिरगुटी येथील दुसऱ्या मुलीच्या अहवालाची प्रतीक्षा लागलेली होती.

ठळक मुद्देसंपर्कातील व्यक्तींचा जीव भांड्यात : अहवालाची प्रतीक्षा संपुष्टात

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पुण्यावरून आलेल्या मेळघाटच्या मुलीसह अकोट येथून चिखलदरा येथील क्वारंटाईन कक्षात असलेल्या गिरगुटी गावातील दुसऱ्याही मुलीचा थ्रोट स्वॅब अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आल्याने अहवालाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रशासनासह स्थानिक तालुक्यातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.तालुक्यातील दोन मुलींना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांना अमरावती येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे मेळघाटात एकच खळबळ उडाली होती. त्यात पुणे येथून आलेल्या मेळघाट येथील मुलीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सोमवारी आल्यानंतर गिरगुटी येथील दुसऱ्या मुलीच्या अहवालाची प्रतीक्षा लागलेली होती. दरम्यान, तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि चार दिवसांपूर्वी तिचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला असता, शुक्रवारी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी लोकमत'ला दिली. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या काहींचा जीव भांड्यात पडला.मेळघाटला स्थलांतरातूनच धोकामेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील हजारो मजूर कामाच्या शोधात दरवर्षी मुंबई-पुण्यासह परराज्यात जातात. परंतु लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात ते परत आले असून अनेक मजूर अद्यापही परत येण्यासाठी धडपड आहेत. त्यांना तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या दोन्ही मुली बाहेरगावाहूनच आल्याने संशयित वाटताच तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.चिखलदरा तालुक्यातील दोन्ही मुलींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. एकीचा गत आठवड्यात, तर दुसरीचा अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आला.- माया माने,तहसीलदार, चिखलदरा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या