शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापनावर नोंदवा

By admin | Updated: August 12, 2016 00:08 IST

प्रथमेश सगणे या चिमुकल्यावर शंकरबाबा यांच्या आश्रम परिसरात झालेल्या खुनी हल्ल्याविरुद्ध आता मातंग समाज एकवटला आहे.

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे अमरावती : प्रथमेश सगणे या चिमुकल्यावर शंकरबाबा यांच्या आश्रम परिसरात झालेल्या खुनी हल्ल्याविरुद्ध आता मातंग समाज एकवटला आहे. प्रथमेश हा मातंग समाजाचा आहे. शाळा मुख्याध्यापक, वसतिगृह अधीक्षक आणि व्यवस्थापन यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाला कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भुजाडणे यांच्या नेतृत्वात शासनाला करण्यात आली आहे. प्रथमेश हा मातंग समाजाचा आणि गरीब आई-वडिलांचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर हा अत्याचार झाला. त्यामुळेच घडल्या प्रकाराबाबत प्रशासनासकट सर्वांनीच चुप्पी साधली. प्रकरण दडपण्यासाठी वसतिगृह, शाळा प्रशासन आणि व्यवस्थापन प्रयत्नरत आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवा अमरावती : प्रथमेशसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे आश्रम परिसरात काय चालते, हे जनतेसमोर उघड झाले आहे. याप्रकरणातून बोध घेऊन शासनाने इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावीत. शंकरबाबांच्या आश्रम परिसरात असलेल्या शाळा, वसतिगृह आणि विद्यार्थ्यांसंबंधीच्या सर्वच मुद्द्यांची बारकाईने तपासणी करावी. मातंग समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शिक्षणासाठी निश्चित करून दिलेला कोटादेखील भरला जात नाही, स्थिती इतकी विदारक आहे. बाहेरगावी शिक्षणासाठी मुलांना पाठविणारे आई-वडील संख्येने फारच कमी आहेत. या घटनेनंतर मातंग समाजात चुकीचा संदेश पोहोचला आहे. मुलांना शिक्षणासाठी पाठविणे धोक्याचेच, असा विचार अशिक्षित असलेला आमचा समाज करू लागला आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर आणि त्यांना बळ देणाऱ्यांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा लहुजी शक्तीसेनेने दिला आहे.