शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अंबानगरीत पुन्हा खुलेआम गुटखा विक्री

By admin | Updated: November 7, 2016 00:26 IST

अंबानगरीत पुन्हा गुटख्याची खुलेआम विक्री करण्यात आहे. त्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत.

एफडीएचे दुर्लक्ष : अन्न सुरक्षा मानदे कायद्याची पायमल्लीसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत पुन्हा गुटख्याची खुलेआम विक्री करण्यात आहे. त्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांनी डोके वर काढले आहे. विदर्भातून अमरावतीत सर्वात जास्त गुटखा विक्री होत आहे. येथील निष्क्रिय एफडीएच्या अधिकाऱ्यांमुळे अवैध गुटखा विक्री फोफावली आहे. त्यामुळे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अशा अधिकाऱ्यांवर कारवार्इंचा बडगा का उगारु नये, असा सवाल अंबानगरीतील जनतेला पडला आहे. शहरात गुटख्याचे अनेक मोठे व्यापारी आहेत. त्यांच्याकडूनच किरकोळ व्यापारी गुटख्याची खरेदी करतात. काही महिन्यांपूर्वी एफडीएची यंत्रणा निकामी झाल्यामुळे व शहरात वाढता गुटखा विक्रीच्या प्रमाणामुळे खुद्द जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी धाडी टाकून कारवाई केली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त करून आॅनकॅमेरा या गुटख्यांची होळी करण्यात आली होती. ही एफडीएला दिलेली चाप होती. पण एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर याचा कुठलाही परिणाम झाला नाही. उलट आम्ही गेंड्याची कातडी लावून बसलो आहे. आमचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, अशीच भूमिका अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची असते. त्यामुळे अशा निष्क्रिय व बेजबाबदार अधिकाऱ्यांना अन्न व पुरवठा मंत्र्यांचे अभय का, असा प्रश्नही पुढे आला. आंब्यांच्या मोसमात कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे विकले जात होते. तसा प्रकार 'लोकमत'ने पुराव्यानिशी लोकदरबारात मांडल्यानंतर नागरिक जागृत झाले. या गंभीर प्रकाराला त्यांनी विरोधही दर्शविला होता. आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड वापरल्याचा अहवाल प्रयोगशाळेच्या तपासाअंती नमुनेसुध्दा दोषी आढळले आहेत. त्यामुळे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात एफडीएच्या कारवायाच होत नाहीत. बोटावर मोजण्या इतपत कारवाया झाल्यात. पण त्यानंतर कारवाई थंडबस्त्यात पडल्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांनी पुन्हा आता डोके वर काढले आहे. त्यामुळे एकतर गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, ही कारवाई केली जात नसेल तर एफडीएचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी येथील अधिकाऱ्यांवर कारवार्इंचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक पाणटपरींवर मिळतो गुटखा राज्यात सर्वत्र गुटखाबंदी लागू असतानाही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे गुटखा विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. प्रत्येक पाणटपरीवर सहज गुटख्याच्या पुड्या व सुंगधीत तंबाखू उपलब्ध होतो. पूर्वी २ रुपयांत मिळणारी गुटख्याची पुडी दामदुप्पट भावने म्हणजे ५ रुपयांत विकली जात आहे. खर्ऱ्याचेही भाव वाढविण्यात आले आहे. त्यामुळे एका अर्थाने गुटखा खाणाऱ्यांची अप्रत्यक्षरीत्या लूट करण्यात येत आहे.