शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये वारंवार फिजिकल रिलेशन!

By प्रदीप भाकरे | Updated: May 17, 2023 14:15 IST

पीडित तरूणीची मे २०२२ मध्ये मावशीकडील लग्नात आरोपी अविनाश याच्याशी ओळख झाली.

अमरावती: ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असताना प्रियकराने वारंवार फिजिकल रिलेशन ठेवल्याची तक्रार एका तरूणीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात केली आहे. १६ मे रोजी रात्री याबाबत आरोपी अविनाश शेजव (रा. अमरावती) याच्याविरूध्द बलात्कार, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, पीडित तरूणीची मे २०२२ मध्ये मावशीकडील लग्नात आरोपी अविनाश याच्याशी ओळख झाली. मोबाईलवरून संवाद वाढला. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले. दोघांनाही प्रेमासह लग्नाच्या आणाभाका घेतल्या. ऑनलाईन क्लासेसदरम्यान ती आरोपीशी बोलायची. चॅटिंग देखील करायची. जून २०२२ मध्ये फिर्यादी तरूणी परत मुळगावी आईकडे परतली. तिने आई वडिलांना अविनाशबददल सांगून त्याच्याशी लग्न करायचे आहे, अशी मनातली भावना बोलून दाखविली. मात्र, तिच्या आईवडिलांना त्या लग्नसंबंधास नकार दिला. त्यामुळे ती २६ जानेवारी २०२३ ला आरोपीला पळून आली.यवतमाळमध्ये सोबत राहू लागले

फेब्रुवारी २०२३ मध्ये आरोपी अविनाश व सदर तरूणी यवतमाळ येथे भाड्याने राहू लागले. तेथे आरोपीने फिर्यादीचे मनाविरुदध तिच्याशी शारीरिक संबंध केले. तिने नकार दिला असता देखील त्याने दारु पिऊन तिच्या मर्जीविरुदध वारंवार शोषण केले. तो प्रकार फेब्रुवारी ते १० मे २०२३ पर्यत चालला. १० मे २०२३ रोजी घरमालकीनीने त्यांच्यातील रोजच्या भांडणामुळे भाड्याचे घर सोडायला लावले. तेव्हा ११ मे २०२३ रोजी आरोपी व तरूणी अमरावतीत परतले. तेथे देखील आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. आरोपीने तिला छोट्या कारणावरुन मारहाण देखील केली.

१५ मे रोजी अमरावतीत मारहाण

आरोपीच्या घरी राहत असताना १५ मे रोजी आरोपीच्या आईने सदर तरूणीला स्वयंपाक करण्यास सांगितला. त्यावर स्वयंपाकासाठी जात असताना अविनाशने तिला वरच्या खोलीत जाऊ नकोस, तेथे सेंट्रींगचे काम सुरू आहे, असे म्हणून तिला ओढले. त्यावर मला भूक लागली आहे, मी स्वयंपाक करते, अशी विनवणी तिने केली. मात्र, त्यावर आरोपीने तिला मारहाण केली. तर पोलिसांत रिपोर्ट दिल्यास तिला धमकी देखील देण्यात आली. त्यामुळे १५ मे रोजी रात्री तिने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. तक्रार नोंदविली.

टॅग्स :Amravatiअमरावती