पैशांची उधळपट्टी : अतिदुर्गम भागाकडे दुर्लक्षधारणी : मेळघाटातील अतिदुर्गम भागाचा संपर्क थेट मुख्यालयापर्यंत व्हावा यासाठी रस्ते बनविण्याचे काम युती शासनाच्या काळात सुरु झाले होते. त्यानंतर १५ वर्षांत अतिदुर्गम भागाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या काळात जुन्याच मार्गावर नवीन रस्ते तयार करण्याचे अफलातून प्रकार सुरु आहे. जे रस्ते जिल्हा परिषद यंत्रणेने काही महिन्यांपूर्वी तयार केले तेही डांबरीकरण. त्यावर पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने डांंबरीकरण करण्याचा प्रताप रचला, याला म्हणतात चमत्कार. असे चमत्कार घडले आहे टेमकी, हरदोली आणि सालई मार्गावर. या गावात अल्पावधीत दुसऱ्यांदा डांबरीकरणाचे काम झाल्याचे कोणालाही नवल वाटले नाही. याऊलट हा नियमच असेल असा विचार करुन लोकांनी तोंड बंद ठेवलेत. पंतप्रधान ग्राम सडक योजनेने रचला इतिहासगावागावांत रस्ते पोहोचावे व पावसाळ्याच्या काळात लोकांना दवाखाण्यापर्यंत येण्यासाठी अडचण निर्माण होऊ, नये यासाठी पतंप्रधान ग्राम सडक योजना ग्रामीण भागात राबविण्यात आली. यालाच पीएमजीएसवाय म्हणून ओळख मिळाली. या योजनेंतर्गत ज्या गावांत मुळातच रस्ते अस्तित्वात नाही अशा गावांची निवड करण्याचा नियम आहे. मात्र या योजनेत पूर्वीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या गावातील रस्ते नूतनीकरणाचे काम सुरु आहे.पूर्वीच अस्तित्वात असणारे डांबरी रस्त्यावर पुन्हा नव्याने डांबरीकरणाचे व पुलाच्या निर्मितीचे कामे हाती घेण्यात आल्याचे चित्र मेळघाटात पहावयास मिळत आहे. सध्या पीएमजीएसवाय योजनेअंतर्गत धारणमहू ते ठाकरमल, सावऱ्या काटा ते गडगा मालूर, खारी ते सालई, बिजुधावडी ते हातीदा, चाकर्दा ते पाटीया या रस्त्याचे काम युध्दस्तरावर सुरु आहे. पूर्वीचे डांबरीकरण रस्त्याचे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे. याकडे गुण नियंत्रण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.जुन्याच रस्त्यावर पुन्हा नव्याने रस्ते बांधणे यालाच म्हणतात का अच्छे दिन, असा सवाल आता मेळघाटातील आदिवासी जनताही विचारु लागली आहे. यामुळे आता युती शासनात बसलेल्या नेत्यांनी मेळघाटातील रस्त्यांचा इतिहास जाणून घ्यावा व त्यावर उपचार शोेधावा, अशी मागणी येथील आदिवासी जनता करीत आहे. असेच चालत राहिल्यास आवश्यकत असलेली स्थळे विकासापासून दूर राहण्याची शक्यता आहे.जनप्रतिनिधीच बेपत्ता तर रडावे कुणाकडे ?मेलघाटात काँग्रेस पक्षाला उतरवून भाजपने पुन्हा सत्ता प्राप्त केली. पंचायत समितीचे अनुभव असणाऱ्या प्रभुदास भिलावेकरसारख्या युवा उमेदवाराला भाजपने निवडून आणले. परंतु मागील ६ महिन्यांपासून त्यांनी मेळघाटत जनसंपर्क यात्रामध्येच आपले लक्ष घातले आहे. त्यांच्या या संकल्प यात्रेने लोकांना ते मिळेनासे झाले आहे. धारणी, चिखलदरा व अचलपूर या तीनही तालुक्यांतील लोक त्यांनी आपली गाऱ्हाणी ऐकविण्यास शोेधत आहेत. मात्र ते दूर-दूर जात असल्याने आता कुणाकडे रडावे, असा सवाल जनता करीत आहे. जनप्रतिनिधीच जागेवर मिळत नसले तर मेळघाटातील चमत्कार तरी कसे थांबणार?
मेळघाटात चांगल्या रस्त्याचे नूतनीकरण
By admin | Updated: April 22, 2015 23:57 IST