लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभापासून तालुक्यातील अनेक शेतकरी ऑनलाईन अर्जातील क्षुल्लक त्रुटींमुळे वंचित होते. अर्जातील त्रुटी त्वरित दूर करण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाने मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन केले होते. यामधून ३०२० शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी ‘ऑन दी स्पॉट’ दूर करण्यात आल्या.केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये हे अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, तालुक्यातून आलेल्या अनेक अर्जांमध्ये एखाद्या किरकोळ त्रुटीसाठी शेतकऱ्यांना वर्षभरापासून तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत तसेच योजनेच्या आर्थिक लाभापासुनही दूर रहावे लागत आहे. ही बाब लक्षात येताच तहसीलदार अभिजित जगताप यांनी शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी तातडीने दूर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी तालुक्यातील सात महसूल मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.२९ जून ते ४ जुलै या दरम्यान ही शिबिरे घेण्यात आली. शिबिरांमध्ये सात मंडळांतील ३०२० शेतकºयांच्या पीएम किसानच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यात आल्या. आता त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.५२ हजार खातेदार २८ हजार नोंदणीतालुक्यात एकूण ५२ हजार ६२ खातेदार आहेत. अद्याप २८ हजार ४३५ पात्र लाभार्थींनी नोंदणी केली आहे. यादरम्यान करजगाव मंडळात ६३५, शिरजगाव कसबा येथे १९०, ब्राम्हणवाडा थडी येथे ५३०, बेलोरा येथे ३५०, चांदुर बाजार मंडळात ५९०, तळेगाव मोहना मंडळात ३९०, आसेगाव मंडळात ३३५ अशा एकूण ३०२० शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर सारण्यात आल्या.पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकºयाला मिळावा, यासाठी मंडळनिहाय शिबिराचे आयोजन केले होते. याामध्ये ३०२० शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या. आता त्यांना योजनेचा लाभ मिळेल.अभिजित जगतापतहसीलदार, चांदूर बाजार
‘पीएम किसान’मधील अडसर दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST
केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये हे अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, तालुक्यातून आलेल्या अनेक अर्जांमध्ये एखाद्या किरकोळ त्रुटीसाठी शेतकऱ्यांना वर्षभरापासून तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत तसेच योजनेच्या आर्थिक लाभापासुनही दूर रहावे लागत आहे.
‘पीएम किसान’मधील अडसर दूर
ठळक मुद्दे‘ऑन दी स्पॉट’ : तीन हजार शेतकरी ठरणार लाभार्थी, त्रुटीत अडकले होते अर्ज