शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अतिक्रमण दूर; ती इमारत स्टेट एक्साईजला देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 21:43 IST

‘मनपाची दुमजली इमारत अतिक्रमितांच्या घशात’ या वृत्तातून ‘लोकमत’ने त्या इमारतीमध्ये पाच वर्षांपासून घुसखोरी करून अतिक्रमण करणाऱ्या प्रवृत्तीवर प्रकाशझोत टाकला होता.  त्या वृत्ताची तातडीने दखल घेत, इमारतीमधील घुसखोरी हाणून पाडण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी रविवारीच यंत्रणेला दिले. ते कार्यालय तेथे सुरळीत सुरू झाले की, तेथील सुरक्षेचा प्रश्नदेखील निकाली निघणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : झारीतील शुक्राचार्यामुळे असामाजिक तत्त्वांच्या व अतिक्रमितांच्या कह्यात गेलेली महापालिकेची राजापेठस्थित दुमजली इमारत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय कार्यालयाला भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. त्यामुळे त्या इमारतीची देखभाल शक्य होऊन तेथील अतिक्रमित आपोआप बाहेर पडणार आहेत. तसे न झाल्यास अतिक्रमण निर्मूलन विभाग आपले कर्तव्य चोख बजावणार असल्याची तंबी प्रशासनाने दिली आहे.‘मनपाची दुमजली इमारत अतिक्रमितांच्या घशात’ या वृत्तातून ‘लोकमत’ने त्या इमारतीमध्ये पाच वर्षांपासून घुसखोरी करून अतिक्रमण करणाऱ्या प्रवृत्तीवर प्रकाशझोत टाकला होता.  त्या वृत्ताची तातडीने दखल घेत, इमारतीमधील घुसखोरी हाणून पाडण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी रविवारीच यंत्रणेला दिले. ते कार्यालय तेथे सुरळीत सुरू झाले की, तेथील सुरक्षेचा प्रश्नदेखील निकाली निघणार आहे. दरम्यान, रविवारी वृत्त प्रकाशित होताच एका व्यक्तीने संकुलाबाहेर वाहने लावण्याची सूचना केली. त्यामुळे रविवारी भरगच्च पार्किंग दिसली नाही.

सांख्यिकी, सल्लागारांच्या कार्यालयाला पर्यायमहापालिकेचे सांख्यिकी अधिकारी योगेश पिठे यांचे मुख्य प्रशासकीय कार्यालयातील कार्यालय दोन वर्षांपासून कुलूपबंद आहे. त्यांच्या कार्यालयाची दुरुस्ती न झाल्याने व ते कुलूपबंद असल्याने लोकांना सांख्यिकी अधिकाऱ्याचे कार्यालय शोधण्यात मोठी पंचाईत होते. हक्काचे कार्यालय नसल्याने पिठे यांना मुख्यालयातील अन्य सहकाऱ्यांच्या केबिनमध्ये नाईलाजाने बसावे लागते. दुसरीकडे नियमित शहर अभियंता रुजू झाल्याने तांत्रिक सल्लागार जीवन सदार यांना बसण्यास कार्यालय नाही. ते अलीकडे पीएम आवास योजना अंमलबजावणी प्रमुख सुनील चौधरी यांच्या दालनात बसत आहेत. त्यांची कार्यालयीन व्यवस्था राजापेठ स्थित मनपा इमारतीत उत्तमरीत्या होऊ शकते.

राजापेठ स्थित महापालिकेची ती इमारत राज्य उत्पादन शुल्क विभागाला भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी त्याबाबत संवाददेखील झाला. तेथील अतिक्रमण त्वरित काढण्यात येईल.- डॉ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, महापालिका 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण