शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘रेमडेसिविर’ मागणीच्या तुलनेत मिळतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्त्वाचे असलेल्या ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनची मागणी कमालीची वाढली आहे. ‘रेमडेसिविर’ मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा ...

अमरावती : कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्त्वाचे असलेल्या ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनची मागणी कमालीची वाढली आहे. ‘रेमडेसिविर’ मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागत आहे. मात्र, मागणी अधिक, पुरवठा कमी अशी जिल्हा आरोग्य यंत्रणेची स्थिती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात गत पाच महिन्यांपूर्वी आलेला ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा साठा आतापर्यंत पुरविला जात आहे.

कोरोना मार्च २०२० पासून सुरू आहे. कोविड रुग्णांवर नेमका कोणता उपचार करावा, याचे निदान डॉक्टरांना देखील लागत नाही. मात्र, कोरोना रुग्णांना ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन दिले की बरे होतात, असा सुरात सूर मिसळला. आता अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची तुडूंब गर्दी होत आहे. ग्रामीण असो वा शहरी भाग असा दोन्ही क्षेत्रात हल्ली ‘रेमडेसिविर’ प्राप्त करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. परिणामी शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याचे चित्र आहे. येथील डॉ, पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात ‘रेमडेसिविर’साठी सकाळी ७ वाजतापासून रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागत आहे. दिवसभर उन्हा-तान्हात उभे राहण्यानंतर महत्प्रयासाने इंजेक्शन प्राप्त केल्या जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नियंत्रणात शासकीय उपजिल्हा रूग्णालय, सुपर स्पेशालिटी व पीडीएमसीच्या कोविड रुग्णालयात ‘रेमडेसिविर’ पाठिवले जातात. डॉक्टरांची मागणी आणि रूग्ण संख्येच्या तुलनेत इंजेक्शन दिले जात असल्याची माहती आहे. मात्र, कोरोना रुग्णांना वेळीच योग्य उपचार व्हावा, यासाठी ‘रेमडेसिविर’ उपलब्ध करावे, अशी मागणी आहे.

----------------------

कोरोना रुग्णांवर उपचाराठी ‘रेमडेसिविर’ची मागणी वाढली आहे. दररोज १५० ते २०० असे व्हायल मिळत असून, रुग्णांचे नातेवाईक ३५० ते ४०० पर्यंत नोंदणी करतात. मात्र, उपलब्धतेनुसार ‘रेमडेसिविर’ देण्यात येत आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच हे इंजेक्शन दिले जाते.

- अनिल देशमुख, अधिष्ठाता, पीडीएमसी.

कोरोना संसर्गाचा वेग लक्षात घेता रूग्णांना वेळीच उपचार मिळणे काळाची गरज आहे. अनेक कोरोना बाधित रुग्णांना ‘रेमडेसिविर’ मिळत नाही. खासगी रुग्णालयात चढ्या दराने ते विकले जात आहे. मात्र, शासकीय रुग्णालयात ‘रेमडेसिविर’चा तुटवडा होत आहे. हे चित्र बदलले पाहिजे.

- प्रमाेद महल्ले, नागरिक, राधानगर

----------------

असा होेेतो दररोज ‘रेमडेसिविर’चा पुरवठा

तिवसा : २०

नांदगाव खंडेश्र्वर : १५

अचलपूर: २०

वरूड : १५

मोर्शी : २०

दर्यापूर: १५

धारणी : १०

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल: १५०

पीडीएमसी : १५०