शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून दिलासा

By admin | Updated: February 12, 2017 00:12 IST

मागील वर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या.

यंदा १७ प्रकरणे : २०१६ च्या जानेवारीत ३९ आत्महत्याअमरावती : मागील वर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या. तसेच जानेवारी महिन्यात ३९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यंदा मात्र या दुर्दैवी दुष्टचक्रातून जिल्ह्याला थोडा दिलासा मिळाला. यंदाच्या जानेवारीत शेतकरी आत्महत्येचे १७ प्रकरणे घडली. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नये, यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा अश्या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार ३१ जानेवारी २०१७ अखेर जिल्ह्यात ३०७१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये १२२१ प्रकरणे मदतीसाठी पात्र, १८१९ अपात्र व ३१ प्रकरणे चौकसीसाठी प्रलंबित आहेत. सततचा दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे नैराश्य येऊन जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबावे यासाठी शासनाने राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी विविध योजना शासनाने राबविल्या. प्रत्यक्षात खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे शासनाने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची पुनर्रचना केली. मात्र मिशन देखील शेतकरी आत्महत्या रोखण्यास अपयशी ठरल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली. मागील वर्षी ३४८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर ३० तासात एका शेतकऱ्याची आत्महत्या असे जिल्ह्याचे दुर्दैवी चित्र होते. किंबहुना गतवर्षी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या होत्या. सलगचा दुष्काळ व नापिकी हे आत्महत्यांमागे प्रमुख घटक होते. मात्र यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने खरिपाला साथ दिली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टचक्रात जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.राज्यात सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात गतवर्षी जिल्ह्यात ३४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद व्हायची. ती ओळख पुसली गेली व सन २०१६ मध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, अशी नोंद झाली आहे. यंदा मात्र जानेवारी महिन्यात शेतकरी आत्महत्यांची कमी झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला.