सुरेश माने यांचे प्रतिपादन : बसपाचा जिल्हा महिला मेळावाअमरावती : बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी महिला कर्ज मागण्यासाठी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवितात. हे आपण आणखी किती दिवस करणार आहोत आता मागणे सोडा देण्याचा अधिकार मिळवा, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्राचे प्रभारी सुरेश माने यांनी केले.स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना माने बोलत होते.यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, नंदेश अंबाडकर, निर्मला बोरकर, दीपक पाटील, मंगेश मनोहरे, सुदाम बोरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना काँग्रस व राष्ट्रवादीवर प्रहार करताना माने म्हणाले, महिला सबलिकरण हे कुण्या राज्यकर्त्यांनी केले नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेने केले आहे. बाबासाहेबांनी देशातील पहिला महिला परिषद नागपूर येथे आयोजित केली होती. महिलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केले.केंद्रातील भाजप-सेनेच्या सरकारवर आगपाखड करताना ‘अच्छे दिन’ कुठे आहेत, असा महिलांना प्रश्न उपस्थित केला. महिलांना घर चालविताना महागाईचा सातत्याने अनुभव येत आहे. या शासन काळात दैनंदिनी लागणाऱ्या मुलभूत गरजांच्या किमती वाढविल्या. ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणत आपणही डोळे मिटून मतदान केले. आता डोळस पणे मतदान करुन अमरावती जिल्हा हा बसपाचा असलेला सुपिक जिल्हा गमावू नका, असे आवाहन त्यांनी केले.तत्पूर्वी कृष्णा बेले यांचे भाषण झाले. त्यांनी बसपाची ध्येय धोरणे सांगून बसपाची देशाला गरज असल्याचे सांगून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ३ सप्टेंबर रोजी आयोजित एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मागणे सोडा, देण्याचा अधिकार मिळवा
By admin | Updated: August 16, 2014 23:14 IST