शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:00 IST

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सिझेरीयन झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी नागपूर येथे मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दुपारी २ वाजता धुमाकूळ घातला.

ठळक मुद्देआकस्मिक मृत्यूची नोंद : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सिझेरीयन झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी नागपूर येथे मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दुपारी २ वाजता धुमाकूळ घातला. डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप त्यांनी केला आहे.उलनाज बानो शे.बिसमिल्ला (२१) रा. विलायतपुरा अचलपूर असे मृत बाळंतीणीचे नाव आहे. सदर महिलेचा ११ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पहिल्यांदाच गर्भवती असल्याने तिला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात २२ डिसेंबर रोजी भरती करण्यात आले होते. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता तिची सिझेरीयन झाली. तिने गोंडस मुलीस जन्म दिला. परंतु तिला आवश्यक प्रमाणात लघुशंका होत नसल्याने तिच्यावर उपचार करणारे डॉ.अमोल चिंचोळे यांच्या लक्षात येताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक जाकीर यांना रुग्णांची माहिती दिली. परतवाडा येथील खासगी डॉक्टरांना पाचारण करून त्यांनीसुद्धा तपासणी केली. त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु रविवारी प्रकृती खालावत असल्याचे पाहून जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यास सांगितले. परंतु सोमवारी सकाळी १० वाजता महिलेचा मृत्यू झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले उपचार चुकीचे ठरवून नातेवाईकांनी धिंगाणा घातला.नवजाताची प्रकृती धोक्याबाहेरअचलपूर येथील डॉक्टरांनी प्रसूतीदरम्यान हलगर्जीपणा केल्यामुळे उलनाज बानोचा मृत्यू झाल्याचा आरोप उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी सोमवारी दुपारी २ वाजता करीत धिंगाणा घातला. उपस्थित डॉक्टरांनी त्यांची समजूत घातली. अमरावती व अचलपूर येथील चार डॉक्टरांच्या चमूने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले. वृत्त लिहिस्तोर पोलिसात कुठलीच तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.उलनाज बानोवर योग्य उपचार झाले. खासगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात आली. शवविच्छेदन अहवालवरून चूक कुणाची हे कळेल. नातेवार्इंकांचा रोष, योग्य होता. त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.- मो. जाकीर, अधीक्षकउपजिल्हा रुग्णालय, अचलपूर