शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या नामंजूर वनहक्क दाव्यांची राज्यपालांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:23 IST

 विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेत समितीचे गठन

अमरावती : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांचे जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेल्या दाव्यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात २२ हजार ५०९ वनहक्क दावे नांमजूर प्रकरणे असून, ती आता विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी पुन्हा सादर करता येणार आहे. त्याकरिता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेत चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

आदिवासींना अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम, २०१२ अन्वये अनुसूचित क्षेत्रातील वनहक्क दावे हे वैयक्तिक आणि सामूहिक असे दोनप्रकारे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार आहे. मात्र, यापूर्वी जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेल्या प्रकरणांवर अपिल करण्याची संधी नव्हती. परंतु राज्यपाल कोश्यारी यांनी गत २३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नामंजूर वनहक्क दाव्यांबाबत विभागीय आयुक्तांकडे आदिवासी बांधवांना दाद मागता येणार आहे. वनहक्क समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त, सदस्य म्हणून उपवनसंरक्षक, अनुसूचित जमातीचे तीन सदस्य यात एक महिला सदस्य असेल. सदस्य सचिव म्हणून ‘ट्रायबल’चे अपर आयुक्त राहणार आहे. विभागीय आयुक्तांना वनहक्क दाव्यांचा निपटारा करुन कार्यवाहीचा अहवाल राज्यपालांकडे पाठवावा लागणार आहे. ९० दिवसांच्या आत सादर करावे लागेल दावे 

१८ मे २०२० पूर्वी आणि नंतरचे दावे अमान्य झाले, अशा दावेदारांना वनहक्क दाव्यांसाठी जिल्हा समितीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येईल, असे परिपत्रकात नमूद आहे. आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त अंतर्गत नांदेड ९३९, अमरावती ४९७, हिंगोली १०४, अकोला ७७ दावे जिल्हा स्तरीय समितीने नामंजूर केले आहे. गत आठवड्यात विभागीय आयुक्तांकडे आदिवासींच्या वनहक्क दाव्यांच्या प्रकरणांबाबत आढावा घेण्यात आला. लवकरच समितीचे गठन होणार असून, प्राप्त दाव्यांवर अपील, सुनावणी घेण्यात येणार आहे. राज्यपालांनी याबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे.- विनोद पाटील, अपर आयुक्त तथा समिती सदस्य सचिव.

टॅग्स :Amravatiअमरावतीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी