शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

लढवय्या नेतृत्वाची पुन्हा सिद्धता!

By admin | Updated: September 7, 2015 23:59 IST

प्रतिष्ठेची ठरलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर यांनी संपादन केलेल्या चमकदार यशामुळे ...

गणेश देशमुख अमरावतीप्रतिष्ठेची ठरलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर यांनी संपादन केलेल्या चमकदार यशामुळे त्यांच्या लढवय्य नेतृत्त्वावर पुन्हा एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले. तालुका पातळीवरील बाजार समिती निवडणुकीचे स्वरुप एरवी लहान असले तरी तिवस्यात मात्र ही निवडणूक दिग्गजांची होती. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, सीपीआय हे पक्ष एकवटले होते. प्रहार पक्षातून निष्कासित झालेले संजय देशमुख यांनी यशोमतींच्या पराजयासाठी जसे उत्साही प्रयत्न केलेत, यशोमतींचे जावई सत्यजित निंबाळकर हेही तसेच यशोमती विरोधकांचे ऊर्जास्त्रोत बनून तिवस्यात डेरेदाखल होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बबलू देशमुख हे त्यांच्या अचलपूर या गृहतालुक्यातील निवडणुकीत व्यग्र होते. तथापि, यशोमतींना डावलण्याची कुठलीही संधी गमावणे त्यांच्या स्वयंसंहितेविरुद्ध असल्याने तिवसा तालुक्यात 'पंजा'वर 'बाण' मारून 'कमळ' फुलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केलेत. एका महिला नेतृत्त्वाविरुद्ध स्वकीय-परकियांनी अशी अभेद्य राजकीय भिंत उभारल्यावर तिची मजबुती लोकमनांवर बिंबविण्यासाठी दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तिवसा तालुक्यात प्रचाराला नेले गेले. त्या दोन्ही पालकमंत्र्यांचा प्रभाव किती, हा मुद्दा स्वतंत्रपणे चर्चिला जावा, असा असला तरी नामदारांच्या शासकीय, प्रशासकीय 'वजना'चा अन् लाल दिव्यांचा प्रभाव ग्रामीण मनांवर पाडण्यासाठीचाच तो सर्वोच्च प्रयत्न होता. बंजारा मते वळविण्यासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि मराठा मतांवर छाप पाडण्यासाठी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांना तिवस्यातील निवडणुकीत प्रचाराचा आग्रह धरण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत पार पडलेल्या चार बाजार समिती निवडणुकांपैकी केवळ तिवसा या एकमेव तालुक्यात दोन पालकमंत्री प्रचारासाठी गेले. तथापि, यशोमतींची छबी या दोन्ही नामदारांच्या छबीपेक्षाही प्रभावी ठरली. काँग्रेस पक्षाच्या धाटनीत नेतृत्वगुणांना मजबुती मिळाली असतानाही यशोमती ठाकूर या आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी ठरवून त्यांच्याविरुद्ध एकी केली होती. भगवी लाट, विरोधकांची हातमिळवणी आणि रक्ताच्या नात्यांनी केलेला दगा या घटना अपयश खुणविणाऱ्याच होत्या. चित्र असे भेसूर असतानाही आत्मविश्वास ढळू न देता, आक्रमकतेला संयमाची जोड देऊन यशोमतींनी विरोधकांचा जो धुंव्वाधार सफाया केला. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही बघायला मिळाली. विरोधाची कारणे द्यायला यशोमतींच्या विरोधकांना जसे त्यावेळी तोंड नव्हते, तसेच यावेळीही ते नाही!