शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य वर्गजोडणी उपसंचालकांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:25 IST

आरटीईनुसार १ किमी अंतराची अट न पाळता जेथे ५ वा वर्ग सुरू आहे व ३ किमी अंतराची अट न पाळता जेथे ८ वा वर्ग सुरू आहे, अशा नियमबाह्य वर्गजोडणी बंद करण्यात याव्यात, असे शिक्षण उपसंचालकांनी निर्देशित करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना १९ मे पर्यंत मागितला आहे.

ठळक मुद्देवस्तुनिष्ठ अहवाल मागितला : शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीईनुसार १ किमी अंतराची अट न पाळता जेथे ५ वा वर्ग सुरू आहे व ३ किमी अंतराची अट न पाळता जेथे ८ वा वर्ग सुरू आहे, अशा नियमबाह्य वर्गजोडणी बंद करण्यात याव्यात, असे शिक्षण उपसंचालकांनी निर्देशित करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना १९ मे पर्यंत मागितला आहे.शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात उपसंचालक प्राथमिक यांच्याकडे ही मागणी केली. त्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत निर्णय नाही, तोवर माघार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच शिक्षण संचालक कार्यालयाने हे पत्र निर्गमित केले. यावेळी शिक्षक महासंघाचे अमरावती जिल्हा सचिव मोहन ढोके, उपाध्यक्ष पी.आर.ठाकरे, नितीन टाले, अमरावती विभागीय प्रसिद्धिप्रमुख अजयसिंह बिसेन, आशिष बोरकर, आकाश भोयर, सुमित वानखडे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. भोयर यांनी गेल्या २ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे. आता इयत्ता ५ व ८ वी चे नियमबाह्य जोडण्यात आलेले वर्ग बंद करण्यात यावे व अशा प्रकारचे वर्ग जोडण्यात येऊ नये, असे आदेश शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांनी अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.असे आहेत शासनाचे आदेशशासनाचे २ जुलै २०१३ निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आवश्यकतेनुसार इयत्ता ५ व ८ वीला वर्ग मान्यता दिली होती. परंतु, त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी इयत्ता १ ते ४ थी पर्यंत शाळा आहे व १ किमी परिसरात त्याच माध्यमाचा वर्ग उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ५ वा वर्ग जोडण्यात येऊ नये, तसेच ज्या ठिकाणी इयत्ता १ ते ७ पर्यंत शाळा आहे व ३ किमी परिसरामध्ये शिक्षणाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी ८ वा वर्ग देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी विभागातील सर्व शिक्षणाधिकाºयांना दिले.