शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘अड्डा२७’ची नोंदणीही रद्द

By admin | Updated: May 13, 2017 00:02 IST

सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा परवाना म्हणून गैरवापर केल्याचा ठपका ठेवत...

अवैध व्यवसायाचा ठपका : सहायक कामगार आयुक्त कार्यालयाची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा परवाना म्हणून गैरवापर केल्याचा ठपका ठेवत शहरातील दोन हुक्का पार्लर्सचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून ‘अड्डा २७’ आणि विद्यापीठ मार्गावरील ‘कसबा’ या दोन हुक्का पार्लरवर ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी दुपारी याबाबतचे आदेश पारित करण्यात आले. ‘सुसंस्कृत शहरात असंस्कृत व्यवसाय’ या मालिकेतून ‘लोकमत’ने हुक्का पार्लर्सच्या बेकायदेशीर व्यवसायावर प्रकाशझोत टाकला होता. त्या अनुषंगाने सहाय्यक कामगार आयुक्तांनी तातडीने दोन्ही हुक्का पार्लर्सचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलेत. महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम १९४८ या कायद्यांतर्गत दुकाने, व्यापारी संस्था, हॉटेल, कर्मनुकीचे साधने इत्यादी व्यवसाय सुरू झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत आस्थापना मालकाने विहित नमुन्यातील फार्म व शुल्क आॅनलाईन भरल्यास त्या कागदपत्राची तपासणी केली जाते व तपासणीत योग्य ठरल्यास त्या आस्थापनेची सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केली जाते. आॅनलाईनमुळे घोळअमरावती : त्यांना नोंदणी दाखला दिल्या जातो, असे सहाय्यक कामगार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. हे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या दस्ताऐवजांची पुर्तता करणे हे संबंधित व्यवसायिकाची जबाबदारी असते. नोंदणी करताना संबंधित व्यवसायाचे नाव, पत्ता, मालकाचे संमती पत्र, महापालिकेची टॅक्स पावती, दोन फोटो व ओळखपत्र अशा सर्व दस्ताऐवजांची पूर्तता करून आॅनलाईन अर्ज सादर केला जाते. या आॅनलाईन अर्जावरून सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक दस्ताऐवजाची शहानिशा करतात आणि सर्व बाबी पडताळून पाहिल्यानंतर संबंधित व्यवसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. ‘अड्डा २७’च्या संचालकांनीे या दस्ताऐवजांची पूर्तता केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. मात्र, "टोबॅको स्मोकिंग झोन" च्या नावाखाली हुक्का पार्लर व डॉन्स सारखे प्रकार ‘अड्डा २७’च्या संचालकांनी चालविल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार नोंदणीकरतेवेळी दुकाने निरीक्षकांच्या निदर्शनास आला नसल्याने चुकीने अड्डा-२७ च्या संचालकांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी डी.बी. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. नोंदणीत दिलेल्या व्यवसायानुसार अड्डा-२७ मध्ये व्यवसाय सुरु नसल्याचे आढळून आल्याने ती नोंंदणी रद्द करण्यात आली आहे. पूर्वी हस्तलिखित नोंदणी प्रमाणपत्र दिले जायचे. व्यवसाय सुरु करणारे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून अर्ज घेत होते. सर्व दस्ताऐवजांची पूर्तता झाल्यानंतर दुकाने निरीक्षक संबंधित प्रतिष्ठानाच्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करायचे व त्या अहवालाच्या आधारे नोंदणी प्रमाणपत्र दिले जात होते. तथापि आता या संबंधीचे अर्ज व दस्ताऐवज आॅनलाईन सादर करण्यात येत असल्याने स्थळ निरीक्षण केल्या जात नाही. आॅनलाईन माहितीच्या आधारेच व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळेच हा घोळ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आॅनलाईन अर्जाच्या माध्यमातून हुक्का पार्लरला नोंदणी दाखला देण्यात आला. नोंदणी दाखला म्हणजे व्यावसायासाठी दिलेला परवाना नाही. आम्ही अशा हुक्का पार्लरला अवैध पद्धतीने व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली नाही. - रा.भा.आडे, सहायक कामगार आयुक्त, अमरावती