शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट कार्याबद्दल वनकर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:19 IST

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अमरावती वनविभागातील वनपाल विनोद कोहळे, राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्षलागवडीत योगदान : अमरावती वनविभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अमरावती वनविभागातील वनपाल विनोद कोहळे, राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.१३ कोटी वृक्षलागवडीत राज्य शासनाने अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या सेवाभावी संस्था, वनाधिकारी कर्मचारी यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा संकल्प सोडला आहे. १३ कोटी वृक्षलागवडीत वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वनक्षेत्रात तब्बल १ लक्ष ४५०० रोपे लागवड करणाऱ्या पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल एका कार्यक्रमात गौरविण्यात आले. रोपवनाचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवत वनसंवर्धनाचा वेगळा संदेश देणाऱ्या वडाळीचे वनपाल राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांनासुद्धा गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला उपवनसंरक्षक हेमंत मीणा, अविनाश कुमार, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, राजेंद्र बोंडे व अमरावती वनविभागाच्या विविध शाखेचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव संरक्षक स्वप्निल सोनोने, जयंत वडतकर व वनकर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत वन कर्मचाऱ्यानी स्वत:ला झोकून देत उद्दिष्टपूर्ती केली. सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्यात वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण झाले. त्याकरिता सूक्ष्म नियोजन, रोपवाटिकेतील कर्मचाºयांचे परिश्रम आदी बाबी महत्त्वाच्या ठरल्या, ही बाब त्यांनी आवर्जून मांडली. डीएफओ मीणा यांचे नियोजनाबाबत सीसीएफने कौतुक केले.जिल्ह्यात ३२ लाख ८६ हजार वृक्षलागवडशासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यात ३२ लाख ८६ हजार ५५१ इतकी लागवड झाली असून, २६ लाख इतक्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण १२६.६३ टक्के इतके आहे. सर्व विभागांनी व समाजातील विविध घटकांनी मिळून ही मोहीम राबविल्याने हे यश मिळू शकले, असे जिल्हा उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा यांनी सांगितले. येथील महादेवखोरी परिक्षेत्रात या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते १ जुलैला झाला होता. ३१ जुलै दरम्यान विविध विभागांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात ६० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती निवृत्त सहायक उपवनसंरक्षक बी.टी. इंगळे यांनी दिली आहे.