शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गास्थापना न करता फलक लावून नगरसेवकांचा निषेध

By admin | Updated: October 3, 2016 00:13 IST

जुन्यावस्तीच्या कंपासपुऱ्यात २ वर्षांपासून रखडलेल्या कामाचा या परिसरातील नागरिकांनी नवरात्र महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मैदानात नगरसेवकांच्या नावे निषेध फलक लावून रोष व्यक्त केला.

रखडलेले काँक्रिटीकरण : नगरसेवकांमध्येच हमरी-तुमरी बडनेरा : जुन्यावस्तीच्या कंपासपुऱ्यात २ वर्षांपासून रखडलेल्या कामाचा या परिसरातील नागरिकांनी नवरात्र महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मैदानात नगरसेवकांच्या नावे निषेध फलक लावून रोष व्यक्त केला. या ठिकाणी दोनही नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. कंपासपुऱ्यातील हनुमान मंदिराजवळ मैदानासह रस्त्यावर आमदार निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. हे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. ज्या ठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविले तो जुन्यावस्तीचा मुख्य मार्ग आहे. पेव्हींग ब्लॉक गुळगुळीत असल्यामुळे येथे अपघात होतात. काहींना गंभीर इजा झाल्यात. यामुळे नागरिकांसह इतरही वाहनचालकांनी मैदानातील पेव्हींग ब्लॉक काढण्याची मागणी रेटून धरली. जुन्यावस्तीत या मैदानातून जावे लागते. तेव्हा आमदारांसह नगरसेवकांनी येथे काँक्रीटीकरण करू, असे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षे होऊनही काम झाले नसल्याचे पाहून अंबाई नवरात्र महोत्सव समिती व कंपासपुऱ्यातील नागरिकांनी नगरसेवकांचा निषेध नोंदविला. या मैदानात नवरात्रीचा गरबा, भागवत, प्रवचने, नरकासूर दहन आदी मुख्य कार्यक्रम होतात. फलक ज्या ठिकाणी लावले तेथे नगरसेवक आले होते. त्याच्यातच आरोप प्रत्यारोप झालेत.हनुमान मंदिराजवळच्या मैदानावर काँक्रिटीकरण करण्यासाठी वॉर्ड विकास निधीतून माझे प्रयत्न सुरू आहे. नवरात्री महोत्सव आटोपल्यावर प्रत्यक्ष त्या कामाला सुरुवात करू. कामाची मंजुरी मिळाली आहे. - जयश्री मोरे, नगरसेविका, बडनेरायेथे काँक्रीटीकरण व सौंदर्यीकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शहर अभियंत्यांनी त्याची नोटशिट तयार केली. त्याचे दस्तऐवज संबंधित विभागाकडे गेले तेथून ते गहाळ झाल्याचे सांगितले जात आहे. लवकरच काम करू. - विजय नागपुरे, नगरसेवक