शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

कचरा वहनासाठी भ्रष्ट एजन्सीला ‘रेडकार्पेट’ !

By admin | Updated: October 17, 2016 00:07 IST

मागील आठ वर्षांपासून शहरातील घनकचरा उचलणाऱ्या एजन्सीने कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा लेखाआक्षेप असतानाही..

‘आॅडिट आॅब्जेक्शन’ला ‘खो ’: कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप अमरावती : मागील आठ वर्षांपासून शहरातील घनकचरा उचलणाऱ्या एजन्सीने कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा लेखाआक्षेप असतानाही त्याच एजन्सीला पुन्हा दीर्घ कालावधीसाठी कंत्राट देण्याचा घाट घालण्यात आला आहे. लेखाआक्षेपाच्या आधारे या एजन्सीला ‘ब्लॅकलिस्ट’ करणे अभिप्रेत असताना पुन्हा त्या एजन्सीची ‘आवभगत’ करण्यात आल्याने संशयकल्लोळ उठला आहे. यंत्रणेने कंत्राटावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी लेखाआक्षेप विचारात घेतले का किंवा जाणुनबुजून बघ्याची भूमिका घेतली? याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे.दरम्यान ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला असला तरी महापालिका वर्तुळात मात्र त्याबाबत संशयकल्लोळ उठला आहे. सुमारे १२ ते १५ कोटी रूपयांचे हे कंत्राट आहे. एकीकडे कोटयवधींचे कंत्राट पूजा कंस्ट्रक्शनलाच मिळावे तर दुसरीकडे मिळूच नये, यासाठी दोन पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या किल्ला लढविल्याचे सर्वश्रुत आहे.महापालिका कार्यक्षेत्रातील प्रशासकीय झोनअंतर्गत निघणारा कचरा ट्रक व डंपर प्लेसरद्वारे उचलून सुकळी कंपोस्ट डेपो किंवा महापालिका सांगेल त्या ठिकाणी नेऊन टाकण्याचे कंत्राट पूजा कंस्ट्रक्शन, वर्धा या एजन्सीला मिळाल्यातच जमा आहे. तांत्रिक आणि आर्थिक बिडमध्ये पूजा कन्स्ट्रक्शन अव्वल ठरल्याने घनकचऱ्याचे कंत्राट त्यांनाच मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी २० नोव्हेंबर २००८ ते १९ नोव्हेंबर २०१३ कालावधीत पूजा कंस्ट्रक्शनकडेच महापालिका क्षेत्रातील कचरा वहनाचे कंत्राट होते. त्यानंतर याच एजन्सीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. दीड महिन्याआधी घनकचरा वहनासाठी निविदा ‘कॉल’ करण्यात आल्या. मागील आठवड्यात या ई-निविदा उघडण्यात आल्या.या निविदा प्रक्रियेला महापालिकेच्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. अशोका एन्टरप्रायजेस, मुंबई, बालाजी कन्स्ट्रक्शन, पूजा कन्स्ट्रक्शन, अमृत व पृथ्वी कन्स्ट्रक्शनने निविदा दाखल केल्या होत्या. यापैकी पृथ्वी कन्स्ट्रक्शनच्या चव्हाण यांची निविदा ‘टेक्निकल बिड’ मध्ये बाद झाली. त्यानंतर शनिवारी फायनांशियल बिड उघडण्यात आली. यात ट्रिपनिहाय दर मागविण्यात आले होते. त्यात पूजा कन्स्ट्रक्शनचे दर सर्वात कमी असल्याने आणि अन्य तीन एजन्सीच्या तुलनेत ते उजवे ठरल्याने हे कंत्राट पूजा कन्स्ट्रक्शनला देण्यात येणार असल्याचे यंत्रणेने म्हटले आहे. कंत्राटावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यापूर्वी आयुक्तांनी पूजा कन्स्ट्रक्शनची ‘बॅक हिस्ट्री’ जाणून घेतली का किंवा त्यांना त्याबाबत अनभिज्ञ ठेवण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. लेखापरीक्षण अहवालात लेखापरीक्षकांनी घेतलेल्या आक्षेपांचे अनुपालन करण्याचा मुहूर्तही पालिकेला मिळालेला नाही.आक्षेपवजा गैरव्यवहाराकडे कानाडोळापूजा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदारांनी गैरव्यवहार केल्याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. महिन्याकाठी ६००ते ७०० ट्रक अधिक कचरा निघाल्याचे कंत्राटदाराने दाखविले होते. तसेच महापालिकेतील संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्याचा पैसा पूर्णपणे कंत्राटदाराने उचलल्याबाबतची बाब महासभेतही उपस्थित करण्यात आली. मात्र, त्यांनतरही पालिकेने कुठलीही कारवाई केली नसल्याने नगरविकास विभागानेही यंत्रणेवर कोरडे ओढले होते.याशिवाय अन्य आक्षेपही घेण्यात आले आहेत. लेखापरीक्षणादरम्यान बँक गॅरंटीच्या अभिलेखांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.आयुक्तांनी घ्यावा निर्णयशहरातील कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी निविदा बोलविण्यात आल्या. उपायुक्तांच्या नेतृत्वात तांत्रिक आणि आर्थिक बिड तपासण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याने पूजा कन्स्ट्रक्शनला कंत्राट मिळाले, असे म्हणता येणार नाही, असे आयुक्त हेमंत पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.