शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींनी माघारली कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:52 IST

आर्थिक अरिष्टांशी झगडणाऱ्या महापालिका प्रशासनासमोर शतप्रतिशत मालमत्ता करवसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपायला उणेपुरे तीन महिने असताना महापालिकेच्या तिजोरीत केवळ १८.२० कोटी रूपये आल्याने चिंतेत भर पडली आहे.

ठळक मुद्दे२९ कोटींचे उद्दिष्ट : वरातीमागून घोडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक अरिष्टांशी झगडणाऱ्या महापालिका प्रशासनासमोर शतप्रतिशत मालमत्ता करवसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपायला उणेपुरे तीन महिने असताना महापालिकेच्या तिजोरीत केवळ १८.२० कोटी रूपये आल्याने चिंतेत भर पडली आहे. पुढील ९० दिवसांत महापालिकेला तब्बल २९ कोटी रूपयांचा मालमत्ता कर वसूल करावयाचा आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मालमत्ता कराच्या वसुलीत तब्बल ३ कोटी रुपयांची घट आली आहे. १ मार्च ते २४ डिसेंबर २०१७ या कालावधीत १८.२० कोटी मालमत्ता कर वसूल झाला, तर मागील वर्षी याच कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत २१.११ कोटी रुपये जमा होते.मालमत्ता पुनर्सर्वेक्षण व कर निर्धारणाला ग्रहण लागल्यानंतर लिपिक व सहायक आयुक्तांनी ‘मेहनत’ करत नव्या मालमत्ता कराच्या अखत्यारित आणल्या. त्यामुळे मालमत्ता कराची मागणी ३७ कोटीवरून ४७.२२ कोटींवर पोहोचली. मात्र, ज्या तुलनेत मागणी वाढली त्या तुलनेत वसुलीचा टक्का कमालीचा घसरला. मार्च २०१७ पासून २४ डिसेंबरपर्यंत १८.२० कोटी ८ रुपयेच करवसुली झाली. गतवर्षीच्या तुलनेत त्यात तीन कोटींची घट आली असताना जानेवारी ते मार्च २०१८ या उर्वरित तीन महिन्यांत तब्बल २९ कोटी रूपये पालिकेला वसुलण्याचे आहेत. त्यासाठी सुटीच्या दिवशीही करवसुली शिबिर घेण्यात येत आहे.महापालिकेच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली प्रचंड माघारल्याने सहायक आयुक्त व करवसुली लिपिकांच्या जबाबदारीत भर पडली आहे. मालमत्ताधारकांनी थकीत वसुली भरून शहराच्या विकासास सहभाग द्यावा व दंड टाळावे, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी केले आहे.पिठे अग्रमानांकित, डेंगरे माघारलेझोनस्तरावर करवसुलीची सर्व जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. पाचही झोनची एकूण मागणी ४७ कोटींच्या घरात असताना यात रामपुरी कॅम्प झोनने सर्वाधिक वसुली करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या झोनचे सहायक आयुक्त योगेश पिठे आहेत, तर पाचही झोनच्या तुलनेत अमित डेंगरे सहायक आयुक्त असलेले भाजीबाजार झोन तूर्तास माघारला आहे.