महापालिकेच्या तिजोरीत भर : उत्तर झोन ठरले अव्वल अमरावती : आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना उत्पन्नवाढीचे लक्ष्य घेवून काम करणाऱ्या महापालिका यंत्रणेने यंदा रेकॉर्डब्रेक कर वसुलीही केली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४२.७९ कोटी रुपये अपेक्षित असतांना ३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ मार्च २०१५ ला १ कोटी ९८ लाख २७ हजार ३४७ रुपये वसूल करुन कर यंत्रणेने चुणूक दाखविली आहे. मावळ्त्या आर्थिक वर्षात महापालिकेने ७६.२२ टक्के मालमत्ता कर वसूली करुन अपेक्षापूर्ति केली आहे. स्थानिक संस्था कर व जकात अशी उत्पन्नाचे कुठलेही स्त्रोत नसल्याने पालिकेची आर्थिक मदार केवळ मालमत्ता करावर अवलंबून असल्याने करवसुलीचे ‘लक्ष्य’ पार करण्याच्या सूचना आयुक्त गुडेवार यांनी अधिनिस्थ यंत्रणेला दिल्या होत्या. २०१५-१६ मध्ये ३५ कोटी रुपयांची अपेक्षा असली तरी ३२.६२ कोटी रुपये संकलीत करण्यात कर विभागातील अधिकाऱ्यांसह संबंधित सहाय्यक आयुक्त व कर्मचाऱ्यांना यश आले आहे. महापालिका आयुक्तांनी वेळोवेळी करसंकलन अधिकाऱ्यांसह उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियमित बैठकी घेवून करवसुली वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. त्याचाच परिपाक म्हणून मालमत्ता कराच्या वसुलीत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. कारवाईचा धडाका १४ एप्रिल २०१५ ला चंद्रकांत गुडेवार आयुक्त म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावला. यात अनेक ‘बड्या’ वर बडगा उगारल्या गेला. न्यायालयीन खटलेही झाले. तथापि दंडवसुलीसोबत जप्ती व अन्य आयुधे वापरुन महापालिकेचे आर्थिक बैठक सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लब्धप्रतिष्ठितांवर कारवाई करण्यात आल्याने समाजात सुसंदेश गेला. पालिका आपली आहे हे अमरावतीकरांच्या मनावर बिंबविण्यात यंत्रणा यशस्वी झाली व वसुलीचा आकडा ही वाढला. पश्चिम झोन ढांग !प्रभाग क्रमांक ५ पश्चिम झोन कर वसुलीत ढांग राहीला आहे. या प्रभागात केवळ ५५.८६ टक्केच करवसुली झाली. इमारतींसह अन्य बड्या व्यावसायिकांनी कर थकविल्याने झोन माघारल्याचे सांगितले गेले. उत्तर झोन अव्वल ठरला रेकॉर्ड ब्रेक ८२.४४ टक्के मालमत्ता कर वसुली करुन प्रभाग क्र. १ उत्तर झोन पालिकेत अव्वल ठरला आहे. सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वात करयंत्रणेने येथे उत्कृष्ठ काम केले आहे. मध्यझोन मध्ये ७३३१, पूर्व झोन मध्ये ७८-७६ तर दक्षिण झोन मध्ये ७८.८१ टक्के मालमत्ता कर वसुली झाली. आमच्या झोनची टीम अॅक्टीव्ह आहे. हे सांघिक यश आहे. पाच वर्षातील ही रेकार्डब्रेक वसुली आहे. झोन स्तरावर राबविण्यात आलेले प्रशिक्षण, वेळोवेळी केलेल्या कारवायांमुळे वसुली शक्य झाली. - नरेंद्र वानखडे , सहा. आयुक्त, उत्तर झोनअन्य झोनच्या तुलनेत वसुलीचा आकडा कमी दिसत असला तरी पश्चिम झोनचा विचार करता २ कोटी ७ लाखांची वसूली समाधानकारक आहे. मागील काही वर्षात वसुलीची टक्केवारी ४२ च्या घरात होती. - प्रवीण इंगोले, प्र. सहाय्यक आयुक्त, पश्चिम झोनगत वर्षीच्या तुलनेत कर वसुलीत तब्बल ३० टक्कयांनी वाढ झाली. आयुक्तांच्या मार्गदर्शनात झोन कार्यालय सह मुख्य कार्यालयातही बैठकी घेवून ैआढावा घेण्यात आले. आयुक्तांच सूचना मोलाच्या ठरल्या. - महेश देशमुख, मूल्य निर्धारक व करसंकलन अधिकारी.
मालमत्ताकराची रेकॉर्डब्रेक वसुली
By admin | Updated: April 2, 2016 00:20 IST