शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

‘गजानन विजय ग्रंथा’चे विक्रमी सामूहिक वाचन

By admin | Updated: June 19, 2015 00:39 IST

पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपूर, चांदूरबाजार व गो.सी. टोम्पे महाविद्यालय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विजयग्रंथाचे सामूहिक ...

सुरेश सवळे चांदूरबाजार पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपूर, चांदूरबाजार व गो.सी. टोम्पे महाविद्यालय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विजयग्रंथाचे सामूहिक महापारायणाचे आयोजन स्थानिक गो.सी. टोम्पे महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. त्यात चांदूरबाजारसह जिल्ह्यातीलच नव्हे, तर विदर्भातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. भाविकांकडून कोणतीही देणगी यावेळी आकारण्यात आली नाही. तरीही काही भाविकांनी येथे आयोजित महाप्रसादासाठी पंधरा हजार भाविकांना पुरेल इतक्या अन्नधान्य दान स्वरुपात दिले. भाविकांच्या सहकार्याने १५ हजार लाडूंचे वितरण यावेळी करण्यात आले. श्री संत गजानन विजयग्रंथाच्या सामूहिक वाचनाला गुरुवारी सकाळी ६.३० पासून सुरूवात झाली. ग्रंथवाचनासाठी हा विजयग्रंथ मुखपाठ असलेले पुण्याचे गजानन खासनिक प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या वाचनापाठोपाठ उपस्थित पाच हजारावर भाविकांनी या २९ अध्यायांचे सहा तासांत वाचन केले. या सामूहिक वाचनाला तालुका, जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भात भाविक उपस्थित होते. गुजरातेतील सूरत येथूनही भाविक आले होते. ४ हजारांवर महिलांची विक्रमी उपस्थिती होती. पुरुष वाचकांची संख्या ११०० च्या जवळपास होती. वेळेवर आलेल्या भाविकांमुळे वाचकांच्या संख्येत अधिकच वाढ झाली. या सामूहिक वाचन कार्यक्रमात पावसाचा अडथळादेखील आला नाही.सामूहिक वाचनानंतर उपस्थित १५ हजारांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात १५ हजारांवर मोतीचूरच्या लाडूंचे वितरण करण्यात आले. विजयग्रंथ नसलेल्या भाविकांना सेवा समितीकडून ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आला. आयोजनाची सर्व जबाबदारी जसे पूजन, महाप्रसाद, स्वच्छता, बैठक, सुरक्षा, जलव्यवस्था, आदींची जबाबदारी सेवासमिती व भाविकांनी स्वीकारली होती. पारायणकर्त्यांसह, गजानन भक्तांची लक्षणीय उपस्थिती व महिलांची विक्रमी संख्या पाहता परिसरात पोलीस विभागाने विशेष सुरक्षेचा बंदोबस्त ठेवला होता. यात वाहतूक विभागही सक्रिय झाला होता. आयोजनात गजानन सेवा समिती नागपूर, चांदूरबाजार, डोमकसह टोम्पे महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सेवा दिली.