शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नोंद कापसाची; घरी बोंडही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी ही कापूस उत्पादक पणन महासंघाकडून सुरू आहे. ही कापूस खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या कापूस खरेदीत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचेच चांगभले होत असल्याचे सुरुवातीपासून बोलले जात आहे. व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचाच सातबारा लावून शासनाला कापूस विकत असल्याचा प्रकार येथे होत आहे. याबाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत.

ठळक मुद्देशासकीय कापूस खरेदी : तपासणी मोहिमेत प्रकार उघड, बहुतांश शेतकऱ्यांची नोंदणी रद्द

चेतन घोगरे।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होऊ नये व त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाकडून हमीभावाने कापूस खरेदी सुरू असली तरी याचा लाभ मात्र मोठ्या प्रमाणात व्यापारी घेत असल्याची ओरड होत आहे. याच मुद्द्यावर प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत असला प्रकार समोर येत आहे. नाफेडकडे नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी कापसाचे बोंडही नसल्याचे चौकशीत समोर येत आहे. अशा शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी रद्द होत असल्याने त्यांच्याकडून टोकन घेणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी ही कापूस उत्पादक पणन महासंघाकडून सुरू आहे. ही कापूस खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या कापूस खरेदीत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचेच चांगभले होत असल्याचे सुरुवातीपासून बोलले जात आहे. व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचाच सातबारा लावून शासनाला कापूस विकत असल्याचा प्रकार येथे होत आहे. याबाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत.दरम्यान, यासंबंधी वृत्ताने संबंधित नोंदणी व नियंत्रण करणाऱ्या संस्था खडबडून जाग्या झाल्या व त्यांनी अंतिम टप्प्यात का होईना, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस आहे की नाही, याबाबत तपासणी सुरू केली. बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी कापूसच आढळला नसल्याने त्यांनी नाफेडकडे केलेली नोंदणी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सोसायटी कर्मचाऱ्यांसमक्ष तात्काळ पंचनामा करून रद्द करण्यात येत आहे. या धडक कारवाईने शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन कापूस विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर चाप बसला आहे. खऱ्यांशेतकऱ्यांची कापूस खरेदीची प्रतीक्षा कमी झाली आहे. कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचा सातबारा वापरून बोगस नोंदी करून शासकीय योजनेचा लाभ लाटणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ फौजदारी दाखल करण्याचे तेथील पालकमंत्र्यांनी जसे आदेश दिले, तसे आदेश स्थानिक प्रशासनाने दिल्याशिवाय या गोरखधंद्यास चाप बसणार नाही, अशा प्रतिक्रिया काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.टोकन विक्री दलाल सक्रियज्या शेतकऱ्यांनी आपल्या सात-बारा दाखवून नाफेडकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, पण त्यांच्याकडे कापूस नाही, अशा शेतकऱ्यांना काही दलाल भेटून, त्यांना पैशाची लालूच देऊन टोकन मिळवित आहेत. या माध्यामातून हे दलाल कापूस व्यापाऱ्यांकडून हजारो रुपये कमावित असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही दिवसांपासून ‘लोकमत’च्या अंकात कापसाच्या अशा हेराफेरीबाबत वृत्त प्रकाशित होत आहे. त्याची दखल घेऊन चौकशी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.तालुक्यातील किती शेतकऱ्यांची कापूस खरेदी शिल्लक आहे, यासाठी तपासणी सुरू आहे. बहुतांश नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा शेतकऱ्यांच्या घरातील स्थितीचे पंचनामे करून त्यांंची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. लवकरच अहवाल पूर्ण होईल.- स्वाती गुडधेसहायक निबंधकअंजनगाव सुर्जी

टॅग्स :cottonकापूस