शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

विद्यापीठ क्रीडा समितीत नियुक्त्यांची फेरपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:55 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात क्रीडा प्रकाराशी संबंधित विविध तदर्थ समित्या गठीत झाल्यानंतर ......

ठळक मुद्देकुलगुरुंची स्पष्टोक्ती : अनुभव, दर्जा बघूनच वर्णी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात क्रीडा प्रकाराशी संबंधित विविध तदर्थ समित्या गठीत झाल्यानंतर यात मर्जीतील लोकांच्याच नियुक्त्या झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने संंबंधितांचे बायोडाटा तपासले जात असून पात्र असेल तरच समितीत नियुक्ती, अशी भूमिका गुरुवारी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी घेतली आहे. मात्र, नियुक्त्यांची फेरतपासणी सुरु झाल्याने ‘सेटींग’ उघडकीस येईल, असे संकेत आहेत.विद्यापीठात क्रीडा प्रकारातील तदर्थ समिती गठीत करताना मर्जीतील आणि जवळीक असलेल्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या आरोपाच्यता पार्श्वभूमिवर कुलगुरु चांदेकर यांनी सदर समितीमधील अध्यक्ष, सदस्यांचे नियुक्त्यांची पुनर्तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. क्रीडा प्रकाराशी संबंधित तदर्थ समितीत वेगवेगळ्या लोकांची वर्णी लावण्यात आली आहे. यात क्रिकेट, हॉकी, खो-खो, टेबल टेनीस, शरीर सौष्ठव, जलतरण आदी समित्यांचा समावेश आहे. या समितीत नियुक्ती करताना अनुभव शून्य असलेल्यांची महत्वाच्या तदर्थ समितीवर नियुक्ती करण्यात आल्याची तक्रार थेट कुलगुरुंकडे झाली आहे. मात्र सदर समितींवर नियुक्तीसाठी सदस्यांची नावे ही वेगवेगळ्या स्तरावर येत असल्याचे कुलगुरुंनी मान्य केले.विद्यापीठाला सर्वच क्षेत्रात बदल अपेक्षित आहे. त्यामुळे काही तदर्थ समितीवर नियुक्ती करताना सहाजिकच बदल अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. काही समित्यांवर नियुक्तीत अन्याय झाल्यामुळे अनेकांनी समितीमधून राजीनामा देखील कु लगुरुंकडे सादर केला आहे. तर काही सदस्यांनी स्वत: कुलगुंची भेट घेऊन अन्याय झाल्याची कैफियत मांडली आहे. मात्र, क्रीडा प्रकारातील समितीवर झालेल्या नियुक्तीबाबत सदर व्यक्तींचे बायोडाटा, शिक्षण आदी बाबी तपासूनच निर्णय घेतला जाईल, असे कुलगुरु चांदेकर यांनी स्पष्ट केले आहे.तदर्थ समित्यांवर नियुक्ती करताना निकष नाही. त्यामुळे पात्र व्यक्तींचीच नियुक्ती अपेक्षित आहे. तथापि काहींची नियमबाह्य किंवा चुकीच्या पद्धतीने नियुक्ती झाली असेल तर बायोडाटा तपासून फेरनिर्णय घेतला जाईल.- मुरलीधर चांदेकरकुलगुरु, संत गाडगेबाबा विद्यापीठ.