केंद्रीय उड्डयनमंत्र्यांचा निर्णय : मुख्यमंत्री फडणवीस, राणांचा पुढाकारअमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरण हे भारतीय विमानपतन प्राधिकरण करणार आहे. त्याकरिता केंद्रीय उड्डययनमंत्री अशोक गजपती राजू यांनी करारनामा करण्याच्या अनुषंगाने आदेश दिले आहेत. विमानतळाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. रवी राणा हे आग्रही असल्याचे दिसून येते.दिल्ली येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. रवी राणा यांनी बेलोरा विमानतळाचा रखडलेला विस्तार, विकासाबाबतच्या समस्या केंद्रीय उड्डयनमंत्री गजपती राजू यांच्या पुढ्यात ठेवली. यावेळी आ. राणा यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठी जमिनीचे अधिग्रहण झाले असून येथे पायाभूत सुविधा मिळाल्या तर प्रवासी विमानसेवा सुरु करणे सुकर होईल. मात्र, विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरण करायचे झाल्यास भारतीय विमानपतन प्राधिकरणाने मान्यता दिल्याशिवाय ते शक्य नाही, ही बाब प्रकर्षाने मांडण्यात आली. ना. अशोक गजपती राजू यांनी आदेश देत भारतीय विमानपतन प्राधिकरणला करारनाम्याचे आदेश दिलेत.
बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाला मान्यता
By admin | Updated: July 5, 2015 00:24 IST