शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात बेवारस लाकूड

By admin | Updated: April 20, 2017 00:16 IST

परतवाड्याच्या लाकूड बाजारात आरागिरण्यांसमोर आडजात प्रजातीचे बेवारस लाकूड पडले असताना ते वनाधिकाऱ्यांना का दिसत नाही?

वनाधिकाऱ्यांंचे दुर्लक्ष : कडुनिंब, गोंदण महारुखाचे लाकूडअमरावती: परतवाड्याच्या लाकूड बाजारात आरागिरण्यांसमोर आडजात प्रजातीचे बेवारस लाकूड पडले असताना ते वनाधिकाऱ्यांना का दिसत नाही? असा सवाल केला जात आहे. लाकूड बेवारस असेल तर ताब्यात घेण्याची कारवाई वनविभाग का करीत नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.जिल्ह्यात सर्वात मोठी लाकडाची बाजारपेठ परतवाडा आहे. मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाड्यात आरागिरण्यांची संख्या देखील जास्त आहे. येथील आरागिरणींचा कारभार मिळविण्यासाठी वनाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा चालते. काहीवेळा मर्जीतील वनाधिकाऱ्यांना परतवाडा खुर्ची मिळावी, यासाठी मंत्रीमहोदयाची फोन देखील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना येत असल्याची माहिती आहे. येथे लाकूड तस्करी ही नित्याचीच बाब असली तरी अवैध वृक्ष कटाई केंव्हा थांबणार, असा सवाल सामान्यांचा आहे. गत काही महिन्यांपूर्वी परतवाडा, अचलपुरात अवैध लाकूड कटाईला लगाम लावण्यात आला होता. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी आरागिरण्यांवर धाडसत्र राबवून अवैध लाकूड जप्तीची कारवाई केली होती. मात्र परतवाड्यात आरागिरण्यांच्या बाहेर बेवारस लाकूड ठेवले जात असेल तर ते ताब्यात घेण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी का धाडस दाखवित नाही, असे बोलले जात आहे. लाकूड बाजारात रस्त्यालगत आरागिरण्यांच्या बाहेर लाकूड बेवारस ठेवणे ही बाब सर्रास सुरू आहे. अवैध कटाईचे बेवारस लाकूड कुणाचे? हे लाकूडबाजारात व्यावसायिकांना माहिती राहते. मात्र अवैध लाकूड आरागिरण्यांमध्ये ठेवल्यास व तपासणी झाल्यास ते अंगलट येऊ शकते त्यामुळे आरागिरणी मालक अवैध कटाईचे लाकूड बेवारस टाकून संधी साधताच ते कापण्यास नेतात, अशी विश्वसनीय माहिती आहे. परतवाडा येथे लाकूड बाजारात बुधवारी १०० टन आडजात लाकूड बेवारस ठेवण्यात आले आहे. यात गोंदण, महारुख, कडूनिम लाकडाचा समावेश आहे. तसेच अचलपूरच्या हिरापुरातही आडजात लाकूड कापून आणले आहे. (प्रतिनिधी)अवैध लाकूड कटाई रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरुच आहे. परतवाडा, अचलपुरात अवैधरित्या आडजात लाकूड आणल्या जात असेल तर आरागिरण्यांची तपासणी करून कायदेशीर कारवाई केली जाईल.- हेमंत मिणाउपवनसंरक्षक, अमरावती.