शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कमाईसाठी पार्सलची देवाणघेवाण!

By admin | Updated: June 28, 2014 23:19 IST

पैशाच्या हव्यासापाई मार्गात एसटी थांबवून पार्सलची देवाण-घेवाण करण्याचा व कमाईचा फंडा चालक-वाहकांनी शोधून काढला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो.

चालक-वाहकांची मनमानी : राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्षअमरावती : पैशाच्या हव्यासापाई मार्गात एसटी थांबवून पार्सलची देवाण-घेवाण करण्याचा व कमाईचा फंडा चालक-वाहकांनी शोधून काढला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो. एसटीचे चालक-वाहक राज्य परिवहन महामंडळाची दिशाभूल करीत असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्रात सर्वांच्या सोईचे प्रवासाचे साधन म्हणून एसटीचा नावलौकिक आहे. अहोरात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीमुळे प्रवाशांना कोठेही वेळेवर पोहोचता येते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील एसटी चालक व वाहकांनी अतिरिक्त कमाईचा फंडा शोधला आहे. अमरावती आगारात येणाऱ्या अन्य शहरातून बाहेर जाणाऱ्या तसेच शहरात येणाऱ्या एसटी बसचे चालक-वाहक पार्सलची देवाणघेवाण करतात. छोट्या-मोठ्या पाकिटांमधून शहरातील अन्य शहरातील मित्रांना, नातेवाईकांना आवश्यक कागदपत्रे किंवा अन्य महत्त्वाचे साहित्य पाठवितात. अल्प खर्चात या पाकिटांची देवाणघेवाण होत असल्याने नागरिक एसटीला प्राधान्य देत आहेत. एसटीचालक व वाहकांंच्या संगनमताने पार्सलची देवाण-घेवाण केली जात आहे. ठिकाण लांबचे असो वा जवळचे अवघ्या ३० ते ५० रुपयांमध्ये पार्सलची देवाणघेवाण केली जाते.अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या एसटीमध्ये चालकांना पार्सल देण्याचे प्रकार खुलेआम सुरू आहे. मार्गात बस थांबवून पार्सलची देवाणघेवाण होत असल्याचे प्रकारही वाढीस लागले आहे. राजकमल चौक, राजापेठ, नवाथेनगर व साईनगर या मार्गावरुन जाणाऱ्या एसटीत हा प्रकार चालतो. पार्सल देण्यासाठी थांबलेल्या एसटीच्या मागे वाहनांची रांग लागते. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी निघालेल्या प्रवाशांनासुद्धा यामुळे ताटकळत राहावे लागते. या प्रकारामुळे प्रवासी त्रस्त झाले असून परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.