शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

दुष्काळाचे १०९ कोटी प्राप्त

By admin | Updated: January 11, 2017 00:09 IST

खरीप २०१५ मध्ये कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला.

शेतकऱ्यांना दिलासा : खरीप २०१५मधील कापूस, सोयाबीनचे नुकसानअमरावती : खरीप २०१५ मध्ये कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. यासाठी मदतीचे १०९ कोटी ३६ लाख रुपये मंगळवारी जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. शासनाने सन २०१५ च्या दुष्काळी जिल्ह्यांची यादी घोषित केली. जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत असून सुद्धा जिल्ह्याचा दुष्काळयादीत समावेश नव्हता. तसेच एनडीआरएफच्या निकषान्वये शासनाने मदतही दिली नाही. दुष्काळी मदतीमध्ये शासनाद्वारा दुजाभाव केला जात असल्याने यवतमाळचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावेळी शासनाने ५० पैशांच्या आत पैसेवारी असणाऱ्या विदर्भातील ११ हजार ८३२ गावांत दुष्काळस्थिती जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यातील एक हजार ८७६ गावांचा समावेश होता. शासनाने केंद्राच्या ८ जून २०१५ च्या निकषाप्रमाणे मदत न देता विदर्भात कपाशी व सोयाबीन पिकांसाठी विमा योजनेची मंडळनिहाय आकडेवारी जाहीर केली.

जनधन खात्यात निधीअमरावती : त्यानंतर कपाशी व सोयाबीनचा विमा न उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या मंडळनिहाय पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यात दोन लाख ३८ हजार ५१९ हेक्टरसाठी एक लाख ९५ हजार ८२१ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविलेला नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १०९ कोटी ३६ लाख रुपयांच्या मदतनिधीची मागणी नोंदविली. मंगळवारी जिल्हा प्रशासनाला हा निधी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून वितरित करण्यात येणार आहे. बँकेत खाते नसणाऱ्या शेतकऱ्यांना जन-धन योजनेमध्ये झिरो बॅलेन्स खाते उघडून त्याखात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सोयाबीनसाठी मिळणार १०८ कोटी ९७ लाख रुपये जिल्ह्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर १०९ कोटी ३६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक १०८ कोटी ९६ लाख रुपये सोयाबीन नुकसानीसाठी आहेत तर कपाशीसाठी ३९ लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये अमरावती १३१९.८५ लाख, भातकुली १३०५.४४, नांदगाव १७५४.६८, धामणगाव रेल्वे ८६०.७४, चांदूररेल्वे ११९१.७८, तिवसा ७०८४.६६, मोर्शी ७११७.२८, वरुड ३७.९५, चांदूरबाजार २१४१.०३, अचलपूर ४०८५.०२, दर्यापूर ४२१.४०, अंजनगाव सुर्जी ६०१.४०, धारणी ७६९.९७ व चिखलदरा तालुक्यात ५१३.५४ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आढावामदतीचे वाटप करण्यासाठी व वेळोवेळी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ समितीचे उपाध्यक्ष आहेत. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) हे समितीचे सदस्य आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी हे समितीचे सचिव राहणार आहेत. ही समिती निधीवाटपाचे वेळापत्रक तयार करणार असून मदतवाटपाचा दर १५ दिवसांनी आढावा देखील घेणार आहे.