शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय प्रवेशाकरिता १ हजार ४५० अर्ज प्राप्त

By admin | Updated: July 15, 2014 23:53 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता १ हजार १२५ असून आतापर्यंत आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये १ हजार ४५० अर्ज प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पहिली यादी

अमरावती : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता १ हजार १२५ असून आतापर्यंत आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये १ हजार ४५० अर्ज प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पहिली यादी २४ जुलै तर अंतिम यादी २८ जुलै रोजी जाहीर होणार आहे. आयटीआय प्रवेशाकरिता आॅनलाईन अर्ज १० जुलैपासून सुरु करण्यात आलीे. जिल्ह्यात आयटीआय प्रवेशाकरिता १,१२५ विद्यार्थ्यांची क्षमता असून त्याकरिता ४७ तुकड्यांमार्फत विद्यार्थ्याना विविध ट्रेडमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये मुला-मुलींचा सहभाग आहे. १० जुलै पासून शहरातील विविध संगणकीय केंद्रावर विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरणे सुरु केल्यावर पहिल्या दिवशी १०० अर्ज प्राप्त झाले होते. तर दुसऱ्या दिवशी १३५ व तिसऱ्या दिवशी जवळपास २०० अर्ज विद्यार्थ्यांनी भरले. १५ जुलै पर्यंत आॅनलाईन अर्ज प्रवेश प्रक्रियेत १ हजार ४५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.२४ जुलै रोजी लागणार मेरिट यादीयेत्या २२ जुलैपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा आयटीआयमार्फत देण्यात आली असुन यावर्षी प्रवेश अर्जामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत आयटीआय प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांनी चागला प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांचा व्यवसाय प्रशिक्षणाकडे अधिक कल दिसुन येत आहे, असे आयटीआयचे उपप्राचार्य डी. डी .मानकर यांनी सांगितले. यावेळी एकाच अर्जामधुन विविध आयटीआय संस्थेमध्ये विद्यार्थी अर्ज करु शकणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यासाठी ही प्रक्रिया लाभदायक ठरत आहे. यामध्ये केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची धावपळ अधिक दिसुन येत आहे. २२ जुलै पर्यंत अर्ज स्विकृत केल्या जाणार असुन २४ जुलै रोजी पहीली मिरीट यादी तयार केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज तपासले जाणार असुन त्यामध्ये त्रुटी आढळल्यास २४ व २५ जुलै रोजी त्रृटी दुरुस्तीकरिता विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला आहे. अंतिम यादी २८ जुलै रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही दिवस मेरीट यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.