रणजित पाटील : उत्पन्नाचे स्त्रोत वाढवाचांदूरबाजार : शहराच्या विकासाकरिता उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा, त्याकरिता शासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार, असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले. न. प. सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांनी नागरिकांची समस्या जाणून पालिकेच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. नगराध्यक्ष मनीषा नांगलिया, उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन, नगरसेवक गोपाल तिरमारे, नितीन कोरडे, भैयासाहेब लंगोटे, एजाज अली, अ. रेहमान, लविना आकोलकर, मीनाक्षी औतकर, सुषमा बर्वे, मुख्याधिकारी मुश्ताक अली उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी गाव विकासाकरिता विविध योजनांचे प्रस्ताव तयार करून शासनस्तरावर योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन केले. स्थानिक नगरपालिकेचे प्रलंबित प्रश्न विशेष बैठक लावून मंत्रालयातील दालनात निकाली लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पालिका प्रशासन अतिक्रमण व अवैध बांधकामाविरुद्ध काय कार्यवाही करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या आढावा बैठकीला अशोक बनसोड, रवींद्र पवार, दिवाकर तायवाडे, किशोर मेटे, विलास तायवाडे, आनंद अहीर, अजय श्रृंगारे, शैलेश पांडे, बाळासाहेब सोनार, मनीष नांगलिया, रावसाहेब घुलक्षे यांच्यासह पालिकेचे बांधकाम पर्यवेक्षक, कार्यालय निरीक्षक, प्रशासन अधिकारी, कर निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, पाणीपुरवठा अभियंता, लेखापालांसह पालिका कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
कामात हयगय करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 00:20 IST