शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

आदिवासी वसतिगृहांच्या आहार वाटप प्रक्रि येला कोर्टातून लगाम

By admin | Updated: August 31, 2015 00:13 IST

येथील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणात सुरु असलेल्या जिल्ह्यातील आदिवासी मुला- मुलींच्या वसतिगृहातील आहार निविदा प्रक्रि येला ...

ई- निविदेवर प्रश्नचिन्ह : आदिवासी विकास विभागाला कोर्टाने फटकारलेअमरावती : येथील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणात सुरु असलेल्या जिल्ह्यातील आदिवासी मुला- मुलींच्या वसतिगृहातील आहार निविदा प्रक्रि येला उच्च न्यायालयातून लगाम लावण्यात आला आहे. दर निश्चित करुन करुन ई-निविदा राबविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आहार वाटप निविदा प्रक्रियेला तुर्तास ‘ब्रेक’ लागला आहे. यासंदर्भात सोमवारी ३१ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.आदिवासी विकास विभागाच्या धारणी येथील प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील २१ वसतिगृहांच्या विद्यार्थ्यांना आहार वाटपासाठी पाच महिन्यापूर्वीे ई- निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र ही प्रक्रिया राबविताना आहार वाटपाचे दर निश्चित करुन ई- निविदा काढण्यात आल्यात. त्यामुळे या निविदेत ठराविक संस्थांनीच सहभाग घेतल्याने स्पर्धा झाली नाही. परिणामी आदिवासी विकास विभागाचा महसूल बुडाला. ई- निविदा प्रक्रिया ‘मॅनेज’ असल्याचा ठपका ठेवून येथील संघर्ष बेरोजगार सहकारी सेवा संस्था, शशिकांत बहुउद्देशीय संस्था व गार्गी बेरोजगार नागरी सेवा सहकारी संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. संयुक्तपणे याचिका सादर करुन आहार वाटप ई-निविदेत झालेला घोळ न्यायालयाच्या निदर्शसनास आणून दिला. परिणामी न्यायालयाने वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आहार वाटप ई- निविदेला लगाम लावत पुढील आदेशापर्यंत ही प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला होत्या. त्यानुसार आहार वाटपात ई-निविदा प्रक्रिया राबविताना आदिवासी विकास विभागाने कोणत्या नियमावलीचा आधार घेतला याचा अहवाल देखील न्यायालयाने मागविला होता. आहार वाटपाची निविदा प्रक्रिया पार पडून १ एप्रिल २०१५ पासून कंत्राट सोपविणे अपेक्षित होते. ई-निविदेतही लोकप्रतिनिधींचे शिफारस पत्रआदिवासी विकास विभागात वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वाटप केला जाणाऱ्या आहाराचा कंत्राट विशिष्ट संस्थेला प्रदान करावा, या आशयाचे पत्र जिल्ह्यातील एका बड्या लोकप्रतिनिधींनी थेट प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहे. ई- निविदेत स्पर्धा अपेक्षित असताना लोकप्रतिनिधींनी जवळील व्यक्तींची कंत्राट देण्याबाबत शिफारस करण्याबाबतचे पत्र दिल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे.वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना आहारवाटपाचे कंत्राट सोपविण्यापूर्वी ई- निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.ज्या संस्थाना कंत्राट मिळाला नाही, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वस्तुस्थिती न्यायालयात कळविण्यात आली - रमेश मवासीप्रकल्प अधिकारीआहारवाटप कंत्राटला वित्तीय मान्यता देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना उच्च न्यायालयातून या प्रक्रियेला स्थगनादेश मिळाला आहे.या प्रणालीवरच आक्षेप आहे.- किशोर गुल्हानेलेखापरीक्षक, आदिवासी विकास विभाग अमरावती.ई- निविदा प्रक्रिया पारदर्शक असावी, असा नियम आहे.तरी देखील या प्रक्रियेत काही लोकप्रतिनिधींनी थेट शिफारसपत्र संस्थांच्या नावे दिले आहे. दर निश्चित करुन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही बाब नियम विसगंत आहे.-राहुल मोहोडयाचिकाकाकर्ता