शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'वॉटर कप' स्पर्धेसाठी मेळघाटातील आदिवासी बांधव सज्ज

By admin | Updated: February 20, 2017 00:11 IST

पानी फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते 'वॉटरकप' स्पर्धेत मेळघाटातील धारणी तालुका पहिल्यांदाच सहभागी होत असून...

अमरावती : पानी फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते 'वॉटरकप' स्पर्धेत मेळघाटातील धारणी तालुका पहिल्यांदाच सहभागी होत असून सध्या या तालुक्यातील विविध गावांतील आदिवासी बांधव प्रशिक्षण घेऊन यंदाच्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.निसर्ग संरक्षण संस्थेच्या मेळघाट मधील हरिसालनजीक बोरी-कोठा रस्त्यालगत उभारलेल्या आदर्श अशा मुठवा समुदाय केंद्रात आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्यात आले. १६ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या शिबिरात १५ गावांमधून ५३ प्रशिक्षणार्थी सहभागी झालेत. महाराष्ट्रातील पाणी टंचाई दूर करण्याच्या उद्देशाने सिनेअभिनेते आमीर खान व किरण राव यांनी सत्यमेव जयतेचे डायरेक्टर सत्यजित भटकळ, रीना दत्ता यांच्या मदतीने स्थापन केलेल्या 'पानी फाउंडेशन' या संस्थेने मागील वर्षी महाराष्ट्रातील १० तालुक्यांत जलसंधारणाची कामे करण्यात आलीत. यंदा वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी राज्यातील ३० तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. याद्वारे ३० हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये ही जलसंधारणाची लोक चळवळ राबविण्यात येत आहे. हरिसालनजीकच्या निसर्ग संरक्षण संस्थेच्या मुठ्वा केंद्रावर प्रशिक्षण शिबिरांमध्ये शनिवारी प्रशिक्षणार्थिनी समतल चर खोदून स्पर्धेत तांत्रिक दृष्ट्या अचूक कामे कशी करायची याचे प्रात्यक्षिक केले. प्रशिक्षणार्थी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणा सोबतच शिस्तीमध्ये, खेळीमेळीच्या वातावरणात अनेक उपयुक्त आणि नवनवीन गोष्टी शिकत आहेत. विविध गावांमधून आलेल्या आदिवासी बांधवांच्या एकमेकांशी नवीन ओळखी पण होत आहेत. प्रात:कालीन प्रार्थना, शिवार फेरी, पाणलोटा संबंधित वेगवेगळ्या फिल्म्स, त्यासंबंधित खेळ, श्रमदान असं सगळंच प्रशिक्षणार्थींना शिकायला आणि प्रत्यक्ष अनुभावायाला मिळत आहे.