शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धानोडी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे चावडी वाचन

By admin | Updated: January 11, 2015 22:43 IST

खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून ३०२ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. शासनाच्या मदतीवाचून कोणताही

चांदूररेल्वे : खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून ३०२ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. शासनाच्या मदतीवाचून कोणताही शेतकरी वंचित राहाणार नाही याची जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी चावडी वाचनप्रसंगी दिली. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीची सर्व ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना माहिती व्हावी, सर्व पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील १९८१ गावांत चावडी वाचन करण्यात येत आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील धनोडी या गावी चावडी वाचन उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती किशोर झाडे, उप विभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार एकबाल अहेमद, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शासनाकडून खरीप पिकासाठी हेक्टरी ४ हजार ५००, बागायतीसाठी ९ हजार रु.आणि फळबागांसाठी १२ हजार रुपये एक हेक्टरच्या मर्यादेत मदत वाटप करण्यात येत आहेत. ही रक्कम उद्या संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. मदत वाटपात दोष राहू नये, सर्वांना यादी पाहता यावी यासाठी ग्रामपंचायतमध्ये यादी लावण्यात येईल. यामध्ये लाभार्थ्यांचे क्षेत्र, बँक खाते क्रमांक रकमेचा तपशील राहणार आहे. यात ज्यांचे नाव नाही किंवा चुकीने दुसऱ्याचे नाव आले आहे. क्षेत्र कमी जास्त आले आहे, अशांनी चुकांची दुरुस्तीसाठी तक्रार करावी. येत्या ७ दिवसांत तक्रारींचे निराकरण करुन वाटपातील चुका दुरुस्त करण्यात येतील. नुकत्याच पडलेल्या थंडीमुळेही पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त झळकले आहेत. त्याबाबतही शासनस्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे गित्ते यांनी सांगितले. हवामानातील बदलाची तसेच गारपीट, पावसाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, त्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये किंवा त्यांना पूर्वतयारी करता यावी, यासाठी कृषि विज्ञान केंद्राकडून प्रत्येक गावातील १० शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. कोणत्या हंगामात कोणती पिके घ्यावीत, केंव्हा पेरणी करावी, अशी उपयुक्त माहिती पुरविण्यात येणार आहे. यावेळी सभापती किशोर झाडे यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक स्वप्निल देशमुख यांनी केले.