पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन होणार, ही आनंदाची बाब आहे. येथून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमाद्वारे क्रीडा मार्गदर्शक निर्माण होतील. आंतरराष्ट्रीय खेळाडू देशाला मिळतील. राज्याचा बजेटमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी २४०० कोटींची तरतूद अपुरी वाटते. राज्यस्तरावरील खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती-अनुदान विकास योजना मिळाल्यास उदयोन्मुख खेळाडूंना बळ मिळेल.
- सदानंद जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त मार्गदर्शक, नांदगाव खंडेश्वर
-------------
फोटो पी ०८ जगदीश राऊत
आजचा अर्थसंकल्प सुखद आहे. त्यात प्रामुख्याने वरूड-मोर्शी येथे संत्रा प्रकल्प मंजूर झाला. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. प्रकल्प उभारणी त्वरेने व्हावी, ती संत्रा उत्पादकांसाठी पर्वणीच असेल.
जगदीश राऊत, संत्रा उत्पादक, चिंचरगव्हाण
---------------------------
फोटो ०८ सुभाष नागमोते
राज्याचा अर्थसंकल्प शेतकरीभिमुख आहे. अर्थमंत्र्यांनी कीटकनाशके, रासायनिक खते यावर जीएसटींमधून सवलत देता येईल का, ते पाहणे गरजेचे आहे. कारण कीटकनाशकांवर १८ टक्के व रासायनिक खतावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येते.
- सुभाष नागमोते, कापूस उत्पादक, खारगड, अंबाडा
------------------
फोटो पी ०८ बाळासाहेब शिरपूरकर
अर्थसंकल्प केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई महानगरपालिकेसाठी आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत झुकते माप देण्यात आले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी तरतूद नाही.
बाळासाहेब शिरपूरकर, भाजप तालुकाध्यक्ष, धामणगाव रेल्वे
-------
फोटो पी ०८ रवीश बिरे
कोरोनाच्याकाळात रोजगार बुडाले. मात्र, एक वर्षात शासनाने अनेकांना रोजगार दिला. या काळात राज्याची मोठी प्रगती झाली. आजचा अर्थसंकल्प हा क्रांतिकारी आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य माणसासाठी या अर्थसंकल्पात तरतूद आहे.
- रवीश बिरे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, धामणगाव रेल्वे