शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रवि राणांचा भाजपला शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST

अमरावती : बहुप्रतीक्षित राजापेठच्या रेल्वे अंडरपासचे वृद्ध आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. आमदार रवि राणा यांनी ...

अमरावती : बहुप्रतीक्षित राजापेठच्या रेल्वे अंडरपासचे वृद्ध आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. आमदार रवि राणा यांनी या राजकीय खेळीने भाजपला शह दिला तसेच पुन्हा एकदा नागरिकांचे लक्ष आपल्याकडे वळविले. महापौर चेतन गावंडे यांनी या अंडरपासचे लोकार्पण लवकरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे शुक्रवारीच जाहीर केले होते, हे विशेष.

बडनेरा विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या आड कुणी येत असेल, तर त्याला आडवे करू, अशी जाहीर तंबी देणारे आमदार रवि राणा यांनी शनिवारी अंडरपासच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ‘हम है राणाजी’ हे दाखवून दिले. तत्पूर्वी, शुक्रवारी आ. राणांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत अंडरपासची पाहणी केली. या कामात काही उणिवा असतील तर त्या रात्रीतून पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी दिले होते. शनिवारी हा अंडरपास हार-फुलांनी सजविण्यात आला होता. आ. रवि राणा गळ्यात केशरी दुपट्टा परिधान शेकडो कार्यकर्त्यांसह लोकार्पणासाठी जात असताना राजापेठ परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. पाच वर्षांपासून या मार्गाच्या बांधकामावर चौकीदारी करणारे ७७ वर्षीय भाऊराव डोंगरे आणि एका शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आ. राणा यांनी रेल्वे अंडरपास शनिवारी जनतेसाठी सुरू करू, हा दिलेला शब्द पाळल्याची चर्चा राजापेठ परिसरात होती.

बल्लू जव्हेरी, सुनील राणा, जयंतराव वानखडे, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे, शिक्षण सभापती आशिष गावंडे, नगरसेविका सुमती ढोके, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती सैरिसे, नितीन बोरेकर, अजय मोरय्या, अजय गाडे, संजय मुणोत, संदीप गुल्हाने, प्रवीण सावळे, अनूप अग्रवाल, अभिजित देशमुख, अविनाश तापडिया, पंकज बोबडे, सचिन भेंडे, विनोद गुहे, पराग चिमोटे, बाळू इंगोले, विलास सोनकुसरे, अनिल मिश्रा, सूरज मिश्रा, संतोष कोलटेके, गणेशदास गायकवाड, महेश मूलचंदानी, किशोर पिवाल, सुरेश खत्री, नाना सावरकर, राहुल बजाज, विकी ढेगेकर, विजू टवलारे, नितीन अनासाने, जयप्रकाश लद्धा, अयूब खान, शहजाद खान, अर्चना तालन, मीरा कोलटेके, शालिनी देवरे, अलका इंगोले, शोभा किटके, चंदा लांडे आदी उपस्थित होते.

---------------

मी जनतेचा आमदार आहे. जनहितासाठी सदैव लढणार आहे. हा मार्ग राजकीय-प्रशासकीय अडथळ्यांमुळे रखडला होता. आज नागरिकांच्या सेवेत मार्ग खुला करताना अत्यानंद होत आहे. हा अविस्मरणीय सुवर्णक्षण आहे.

- रवि राणा, आमदार