शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रवी राणा यांनी दिला सामाजिक कृतज्ञतेचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:42 IST

नजीकच्या शिराळा पुसदा येथे रविवारी रात्री ८.३० वाजता अचानक चार घरांना आग लागली. या आगीत सहा जनावरे होरपळली, तर दोघे जण गंभीररित्या भाजले. घरांसह साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी आगग्रस्तांना सर्वप्रथम भेट देत सामाजिक कृतज्ञतेचा परिचय दिला. पुसदा हे वलगावनजीक गाव आहे.

ठळक मुद्देपुसदा येथील आगग्रस्तांना भेट : सहा जनावरे दगावली; दोघे जण भाजले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नजीकच्या शिराळा पुसदा येथे रविवारी रात्री ८.३० वाजता अचानक चार घरांना आग लागली. या आगीत सहा जनावरे होरपळली, तर दोघे जण गंभीररित्या भाजले. घरांसह साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी आगग्रस्तांना सर्वप्रथम भेट देत सामाजिक कृतज्ञतेचा परिचय दिला.पुसदा हे वलगावनजीक गाव आहे. पुसदा येथे रविवारी रात्री अचानक चार घरांना आग लागली. हवेला वेग असल्याने एका घराला लागलेली आग चार घरांपर्यंत पोहोचली. ग्रामस्थांनी त्यांच्या पद्धतीने घरांना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला.जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे सदस्य प्रकाश साबळे यांच्या माहितीवरून अग्निशमन वाहनांना घटनास्थळी येऊन आग विझविली. सुमारे दीड तास चाललेल्या आगीत सहा जनावरे होरपळली. या घटनेत आगग्रस्त चारही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. शेख कलाम शेख सलाम आणि शेख बशीर शेख गफ्फार हे दोघेही भाजले.दरम्यान, सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पुसदा येथे आ. रवी राणा यांनी आगग्रस्त घरांना भेट दिली. त्यांची आस्थेने विचारपूस करताना आ. राणा यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शासनाकडे तात्काळ पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आगग्रस्तांना दिला.शेख बशीर शेख गफ्फार, शेख कलाम शेख सलाम, अजय इंगोले व दादाराव कडू या चारही आगग्रस्तांची भेट घेत आ. राणा यांनी सांत्वन केले. आगीच्या घटनेनंतर आगग्रस्तांची व्यथा जाणून घेण्यासाठी आ. रवी राणा हे पुसदा येथे पोहोचणारे पहिले लोकप्रतिनिधी ठरले, अशी भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. यावेळी आ. राणा यांच्यासह मुकुंदराव देशमुख, प्रकाश साबळे, राजेंद्र भुयार, संजय काळे, वैभव सोलव, गणेश कडू, शिल्पा इंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार रवी राणा यांच्या भेटीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.