शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा फटका, रेशन मिळेना;  १ हजार ९१४ दुकानांना टाळे!

By जितेंद्र दखने | Updated: January 1, 2024 19:30 IST

विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार एकवटले.

अमरावती : रेशनवर स्वस्त आणि मोफत वस्तू देण्याच्या घोषणा दिवसेंदिवस वाढत आहेत. या साहित्याच्या वितरणाची जबाबदारी असलेल्या रेशन दुकानदारांची यामुळे कोंडी होत आहे. तुटपुंजे कमिशन, ‘पीओएस’ मशिनमध्ये सतत होणारा बिघाड, सुविधांचा अभाव यामुळे त्रस्त झालेल्या रेशन दुकानदारांनी १ जानेवारीपासून ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर्स फेडरेशन यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक वेलफेअर संघाने बेमुदत संप पुकारला. या आंदोलनामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात रेशनवरील वस्तू लाभार्थ्यांना मिळणे कठीण झाले आहे.

देशात सर्वसामान्य जनतेला रेशनवर स्वस्त धान्य वितरित केले जाते. याचा लाभ लाखाेंपेक्षा अधिक जनतेला होतो. निवडणुकीच्या काळात अशा दुकानांतून अधिकाधिक वस्तू देण्याची घोषणा होते. मात्र, वितरकांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पूर्वी या वितरकांना चांगले कमिशन हाेते. आता मात्र विक्री ऑनलाइन झाल्याने त्यावर मर्यादा आल्या आहेत. ‘फाइव्ह जी’च्या जमान्यात ‘टू जी’ची यंत्रणा असलेल्या पॉश मशिन दिल्या आहेत. ‘एक देश, एक रेशन’ उपक्रमासाठी सुविधांचा अभाव आहे. तुटपुंजे कमिशन, इतर वस्तू विक्रीसाठी नसलेली परवानगी, वाढत असलेले लाभार्थी, अन्न सुरक्षा व मोफत धान्य वाटप, ‘आनंदाचा शिधा’सारख्या नवनवीन योजना वाढत असल्या, तरी दुकानदारांच्या पदरात फारसे काही पडत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. सरकारकडे मागण्यांची दखल न घेतल्याने रेशन दुकानदारांनी अखेर देशव्यापी विक्री बंदचे हत्यार उपसले आहे. १ जानेवारीपासून जिल्हाभरातील यामुळे १९१४ दुकानांना टाळे लागले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याची माहिती प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे पाटील यांनी दिली. दृष्टिक्षेपातदुकाने : १९१४एकूण कार्डधारक : ६ लाख १६ हजार ९१लाभार्थी : २४ लाख ४८ हजार ५२१मिळणारे कमिशन : १०० किलो विक्रीला १५० रुपये 

टॅग्स :Amravatiअमरावती